दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
Tomato Rasam: सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात नेहमीच काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे घरातच नवनवीन रेसिपी मुलांसाठी बनवाव्यात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो रस्सम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटो रस्सम बनवताना सगळ्यात आधी टोमॅटो शिजवावे लागतात. पण या पद्धतीने टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी टोमॅटो शिजवण्याची किंवा भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही. गरमागरम भातासोबत टोमॅटो रस्सम अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो रस्सम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






