Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सर होण्याआधी शरीर देत असतो ‘हे’ संकेत, याकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण! वेळीच सावध व्हा

Cancer Signs: कॅन्सर हा एक जीवघेणा आजार असून आजकाल याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. तुम्हाला माहिती आहे का? कॅन्सरचा आजार शरीराला जडण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 06, 2025 | 03:45 PM
कॅन्सर होण्याआधी शरीर देत असतो 'हे' संकेत, याकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण! वेळीच सावध व्हा

कॅन्सर होण्याआधी शरीर देत असतो 'हे' संकेत, याकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण! वेळीच सावध व्हा

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या या बदलत्या युगात अनेक आजारांचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. जसजसा काळ बदलत आहे तसतसे आजारांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. आता कॅन्सरकडेच पाहा… पूर्वी क्वचितच कुणालाही तरी होणारा हा आजार आता सर्वसामान्यांनाही सर्रास होऊ लागला आहे. कॅन्सरचा आजार काही साधासुधा नव्हे यामुळे आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यावर उपचार उपलब्ध असले तरी हा आजार वाढल्यास यावर उपचारही कोणता परिणाम दाखवत नाहीत आणि नकळत आपण मृत्यूला बळी पडतो.

अनेक सेलिब्रिटींनाही या आजारने हैराण केले आहे. गेल्या काळात तुम्ही याबाबत अनेक बातम्या ऐकल्या असाव्यात. टीव्ही अभिनेत्री हिना खानदेखील ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहेत. अशात कॅन्सरबाबत जागरूकता वाढवणे आणि कर्करोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे बनले आहे. हा आजार अनेक स्टेजेसमध्ये येतो ज्यात शेवटचा स्टेज सर्वात धोकादायक मानला जातो यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. अनेकांना कॅन्सर हा आजार आपल्याला आहे हे समजतच नाही बहुदा याच्या संकेतांकडे ते दुर्लक्ष करतात ज्यामुळे याच्या स्टेजेस वाढू लागतात आणि शेवटच्या स्टेजमध्ये आपण थेट मृत्यूस बळी पडतो.

पण आता चिंता करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या काही सध्या लक्षणांविषयी माहिती सांगत आहोत ज्यांच्यावर वेळीच उपचार करून तुम्ही कॅन्सरचा धोका टाळू शकता. आपले शरीर आपल्याला याबाबतचे काही संकेत देत असतो. हे नक्की कोणते संकेत आहेत ते आज आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.

महिनाभर ‘हा’ रस प्या, कोलेस्ट्रॉल मधुमेहासारख्या 100 आजारांपासून मिळेल सुटका; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

अचानक वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होत असेल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. हे असे होणे कर्करोगाचे लक्षण असू शकते. पचनसंस्थेशी संबंधित कर्करोग जसे की जठर, स्वादुपिंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग असल्यास अचानक वजन कमी होण्याची लक्षणे दिसून येतात. जर तुमचेही असे अचानक वजन कमी होत असले तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

शरीरात गाठी किंवा त्वचेचा घट्टसर भाग निर्माण होणे

शरीरात कोणत्याही ठिकाणी गाठ निर्माण होणे अथवा त्वचेचा घट्टसर भाग जाणवत असेल तर हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. विशेषतः स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या बाबतीत अशा गाठी आढळून येतात. या सुरुवातील वेदना देत नाहीत ज्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र हळूहळू त्या भागात जळजळ किंवा वेदना निर्माण होऊ लागते. असे कोणतेही बदल शरीरात जाणवत असल्यास वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वयाच्या पन्नाशीतही 25 वर्षांचे दिसाल, फक्त घरातील या 5 पदार्थांचा वापर करा; चेहरा होईल काचेसारखा नितळ

असामान्य रक्तस्त्राव होणे

शरीराच्या कोणत्याही अवयवातून अनपेक्षित रक्तस्त्राव होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. लघवीमध्ये रक्तस्त्राव होणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे संकेत असू शकते. तर, स्तनातून रक्तस्त्राव होणे किंवा रक्त दिसणे हे स्तनाच्या कर्करोगाचे संभाव्य लक्षण आहे. मासिक पाळीव्यतिरिक्त गर्भाशयातून रक्तस्राव होणे, हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे शरीरातील या बदलांची वेळीच दखल घ्या आणि योग्य ते उपचार करा.

Web Title: Never ignore these cancer signs which our body gives know cancer symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • cancer risks
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
1

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
4

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.