(फोटो सौजन्य: istock)
आपले सौंदर्य हे आपल्या हातात असते. चेहऱ्याची उत्तमरित्या काळजी घेतल्यास चेहऱ्याच्या समस्या जाणवत नाहीत अथवा त्या लवकर बऱ्या करता येतात. बदलत्या वातावरणाचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणे, डाग, मुरूम अशा अनेक समस्या निर्माण होतात. जसजसे आपले वय वाढू लागते तसतशा या समस्या आणखीन वाढू लागतात आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य ढासळू लागते.
वयोमानानुसार चेहऱ्यावर त्याचा बदल जाणवणे सामान्य आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, काही घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा नितळ आणि सुंदर बनवून ठेवू शकता. तुमचा निर्जीव पडत चाललेला चेहरा यामुळे तेजमय होईल आणि चेहऱ्यावरच्या समस्याही कमी होतील. मुळातच आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक औषधी पदार्थ असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो हे पदार्थ फक्त जेवणाची चवच नाही वाढवत तर आपल्या सौंदर्यात भर पडण्यासही आपली मदत करतात.
आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयानक तोटे
हळद
अनेकांना हे ठाऊक आहे की हळद आपल्या चेहऱ्यासाठी किती गुणकारी ठरते. यातील नैसर्गिक घटक चेहऱ्यासाठी लाभदायक ठरतात. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम आणि त्वचेवरील संसर्ग कमी करतात. हळदीच्या नियमित वापराने चेहऱ्याचा रंग उजळतो आणि टॅनिंगची समस्या दूर होते. तुम्ही याचा फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावू शकता.
चंदन
चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या नैसर्गिक पदार्थांमध्ये चंदनाचा आवर्जून समावेश होतो. फार पूर्वीपासून चेहऱ्यासाठी चंदनाचा वापर केला जात आहे. याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग दूर होते आणि त्वचेचा निखार वाढतो. तुमचा चेहरा पुन्हा पुन्हा ऑईली होत असल्यास तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर याचा वापर करू शकता. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल खेचून काढते. बाजारात चंदनाची पावडर उपलब्ध आहे ज्याचा वापर करून यापासून फेसपॅक तयार करू शकता.
एलोवेरा
एलोवेरा ही औषधी वनस्पती चेहऱ्यासाठी अनेकरित्या फायदेशीर ठरते. याचा नियमित वापर चेहऱ्याला हायड्रेट करण्यास मदत करते. एलोवेराचा नियमित वापर त्वचेला मॉइश्चरायझ करतो आणि मुरुम कमी करतो. सनबर्न आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आपल्या चेहऱ्यावर एलोवेराचा वापर करू शकता. आजकाल बाजारात एलोवेरा जेल सहज उपलब्ध होते. याला तुम्ही डायरेक्ट चेहऱ्यावर लावून मसाज करू शकता अथवा फेस पॅकमध्ये टाकून याचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता.
कडुलिंब
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील जीवजंतू दूर करण्यास मदत करतात. . याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावर मुरुम कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक तजेला मिळतो. तसेच यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल देखील कमी होते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. तुम्ही कडुलिंबाचा रस अथवा त्याच्या पानांची पेस्ट तयार करून याचा आपल्या चेहऱ्यावर वापर करू शकता.
Gas cylinder ची डिलिव्हरी घेण्यापूर्वी ही छोटी गोष्ट घरात ठेवा, हजारो रुपयांची बचत होईल
केसर
अन्नपदार्थातच नव्हे तर चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीतही केसराची फार मदत होत असते. केशराचे दूध किंवा मधाबरोबर सेवन केल्यास त्वचेस नैसर्गिक उजळपणा मिळतो. तसेच तुम्ही याचा फेसपॅक देखील तयार करू शकता. याचा फेसपॅक चेहऱ्यावरील मुरूम दूर करतात आणि त्वचेतील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. कोरड्या त्वचेसाठी केसर एक उत्तम पर्याय आहे.