शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान
मुंबई : जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ४९ वर्षीय, रेखा मेहता (बदललेले नाव) यांच्यावर यशस्वी उपचार केले आहेत, ज्यांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर गंभीर, जीवघेण्या गुंतागुंती झाल्या होत्या. त्यांना अतिशय गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते, त्यांच्या केसचे व्यवस्थापन जसलोकच्या सुपर-मल्टि-स्पेसिलीटी टीमने वेळेवर, समन्वित निर्णय घेऊन उपचार केले.
फेब्रुवारी २०२५ मध्ये, रुग्णावर अहमदाबादमध्ये बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन महिन्यांनंतर, तिला गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यावरील आपत्कालीन उपचाराकरिता नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला गॅस्ट्रो-जेजुनोस्टोमी अल्सर (पोट व लहान आतड्याच्या जोडणी मध्ये एक छिद्र) साठी आपत्कालीन लॅपरोटॉमी (पोट उघडण्यासाठी आणि तपासण्यासाठी पोटाची शस्त्रक्रिया) करण्यात आली. मूत्रपिंडात तीव्र दुखापत (अचानक मूत्रपिंड निकामी होणे) आणि हृदयविकाराचा झटका यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली व गुंतागुंतीची झाली.
नवी मुंबई येथे उपचारांनंतरही, गॅस्ट्रिक लीक (पोटातील पदार्थ बाहेर पडणे), जखमेचे डिहिसेन्स (शस्त्रक्रियेने जखम पुन्हा उघडणे) आणि श्वसनाचा त्रास यामुळे तिची प्रकृती आणखी बिकट होत गेली. हताश होऊन, तिच्या कुटुंबाने मदतीसाठी डॉ. संजय बोरुडे यांच्याशी संपर्क साधून विनवणी केली. रुग्णाच्या प्रकृतीची गंभीरता ओळखून, डॉ. बोरुडे यांनी त्यांना तातडीने जसलोक येथे हलविण्याचा सल्ला दिला.
साधरणतः मे २०२५ मध्ये जेव्हा तिला जसलोकमध्ये दाखल केलं, तेव्हा तिला बीआयपीएपी (नॉन-इन्व्हेसिव्ह श्वसन सहाय्य), हाय-फ्लो नॅझल कॅन्युला (ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टम) व इंटेन्सिव्ह मॉनिटरिंगची आवश्यकता होती. डॉ. पिनाक पंड्या, चीफ इंटेन्सिव्हिस्ट यांच्या नेतृत्वाखाली मल्टिडिसिप्लिनरी टीमने टार्गेटेड अँटिबायोटिक्स, थायरॉइड मॅनेजमेंट, न्यूट्रिशन सपोर्ट आणि वुंड (जखम) केअरद्वारे रुग्णाला स्थिर केले.
प्रकृती सुधारल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. संजय बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. राहुल बोरुडे आणि डॉ. जयदीप पालेप यांच्या सहकार्याने पार पडली. ऍनेस्थेसिया विभागाचे मार्गदर्शन डॉ. प्रेरणा गोम्स, अॅडिशनल डायरेक्टर अॅनेस्थेसियॉलॉजी यांनी केले. ऑपरेशनदरम्यान पोटामध्ये चिटकून गेलेले अवयव (अॅड्हिजन्स), पू (इन्फेक्शन पॉकेट्स) आणि गॅस्ट्रिक पेरफोरेशन (पोटामध्ये छिद्र) आढळले. डॉ. बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छिद्र अत्यंत काळजीपूर्वक दुरुस्त केले गेले, ओमेंटमन (पोटातील नैसर्गिक चरबीचे आवरण) मजबुतीकरण केले गेले व ड्रेन्स ठेवण्यात आले.
ऑपरेशननंतर रुग्णाला इतर उपचारांची आवश्यकता होती. यात इमेजिंग (सीटी स्कॅन, एक्स-रे), एंडोस्कोपिक प्रक्रियांचा (कॅमेराद्वारे तपासणी) समावेश होता. फिस्टुला क्लिपिंग (असामान्य मार्ग बंद करणे) व प्ल्यूरल इफ्युजन ड्रेनेज (फुफ्फुसाभोवतीचे द्रव काढणे) करण्यात आले. सतत उद्भवणाऱ्या इन्फेक्शन्स, ज्यात कँडिडा ऑरिस (औषध-प्रतिरोधक फंगल इन्फेक्शन) यांचाही समावेश होता, यावर डॉ. पंकज धवन (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) आणि डॉ. माला कनेरिया (इन्फेक्शस डिसीजेस) यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार झाले. ब्लड ट्रान्सफ्युजन्स, अल्ब्युमिन थेरपी (प्रोटीन पूरकता) आणि अरिदमियाज (हृदयाचे अनियमित ठोके) साठी कार्डियॉलॉजीचे मार्गदर्शन मिळाले. हळूहळू प्रकृती सुधारत गेली आणि रुग्णाला पुन्हा तोंडावाटे आहार घेता आला. एकूण 64 दिवस दाखल राहून मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस ती आता पूर्णपणे बरी झाली.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे बॅरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे म्हणाले, “मी पहिल्यांदा रुग्णाची तपासणी केली तेव्हा तिच्या पोटाची स्थिती खूपच गंभीर होती, शस्त्रक्रिया केलेल्या भागाभोवती गंभीर संसर्ग, चिकटपणा आणि पू जमा होत होता. शस्त्रक्रियेतील प्रत्येक टप्पा हाय-रिस्क होता. गॅस्ट्रिक पेरफोरेशन दुरुस्त करताना अचूक निर्णय व काळजीपूर्वक लेयर बाय लेयर क्लोजर करणे आवश्यक होते. हळूहळू तिची प्रकृती स्थिर होताना पाहणे खूप समाधानकारक आहे. या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल मी विशेषतः डॉ. राहुल बोरुडे आणि डॉ. जयदीप पालेप यांचे आभार मानतो.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे इंटेन्सिव्हिस्ट चीफ डॉ. पिनांक पंड्या म्हणाले, “ही केस सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची होती, कारण अवयवांच्या व्याधींमुळे रुग्णाची प्रकृती आधीच अत्यंत गंभीर होती. आमचे प्राथमिक लक्ष तिचे श्वसन आणि रक्तस्त्राव स्थिर करून संसर्ग, पोषण आणि जखमेची काळजी घेण्यासाठी विविध विशेषज्ञांशी समन्वय साधणे हे होते. या केसचे यश हे टीमवर्क, आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची तत्परता आणि देखरेखीमधील सातत्य आहे, ज्यामुळे आम्ही रुग्णाला जीवघेण्या परिस्थितीतून परत आणण्यात यशस्वी झालो.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आम्ही पाहिलेल्या पोस्ट-बॅरिअाट्रिक केसेसमध्ये ही सर्वात आव्हानात्मक केस होती. रुग्ण जीवघेण्या गॅस्ट्रिक लीक, मोठ्या प्रमाणात वुंड डीहिसन्स (शस्त्रक्रियाच्या उघड्या जखमा) आणि सततच्या इन्फेक्शन्ससह दाखल झाली होती. तिच्या प्रत्येक टप्प्यातील उपचारांमध्ये सतत दक्षता, अचूकता आणि मल्टिडिसिप्लिनरी टीमवर्कची गरज होती. ही केस यशस्वीरित्या हाताळणे हे जसलोक हॉस्पिटलच्या तज्ज्ञतेचे आणि शिस्तबद्ध टीमवर्कचे प्रतिक आहे.”