पोट बाहेर येऊ लागले आहे? मग आजच पाण्यात हे घरगुती मसाले मिसळून प्या, आठवड्याभरातच एक्स्ट्रा फॅट जाईल वितळून
सध्याच्या युगात अधिकतर लोक घरातील अन्न कमी आणि बाहेरचे जंक फूड जास्त खाऊ लागली आहेत. कामाच्या व्यापसमुळे अधिकतर लोक बाहेरून जेवण खरेदी करून त्याचा आनंद लुटतात मात्र याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो, परिणामी लोक फार कमी वेळेत लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले दिसून येतात. व्यायाम न करणे, चुकीची जीवनशैली, एकाच ठिकाणी सतत बसून राहणे अशा सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू लागते. सदृढ आरोग्यासाठी आपले वजन नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे.
जन वाढण्याची पहिली चिन्हे पोटाच्या चरबीमध्ये दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुमचेही पोट हळूहळू बाहेर येत असेल, पोटाची चरबी वाढत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही या समस्येला अवघ्या काही दिवसांतच पळवून लावू शकता आणि तुमची वाढलेली चरबी कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही तर फक्त काही घरगुती पदार्थांच्या वापराने तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. चला तर मग घरच्या घरी हे फॅट बर्निंग ड्रिंक्स कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.
2 रुपयांचा हा उपाय चेहऱ्यावरील सर्व ब्लॅकहेड्स करेल दूर, फेशियलचीही गरज भासणार नाही
डिटॉक्स पाणी प्या
आपल्या शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता असते अशात शरीराला हायड्रेट ठेवने फार गरजेचे असते. पाण्याचे पुरेपुर सेवन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण अधिक पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. पाणी प्यायल्याने कॅलरीजही जलद बर्न होतात. महिलांनी दिवसातून 9-10 कप पाणी आणि पुरुषांनी 12-13 कप पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठीचा हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे.
धण्याचे पाणी
स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणारा हा पदार्थ वजन कमी करण्यास तुमची फार मदत करू शकतो. धणे हे फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठीही वापरले जाऊ शकते. यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी टाका आणि यात एक चमचे धणे घालून पाणी उकळवून घ्या. तयार पाणी गाळून घ्या आणि पाणी कोमट गरम झाले की ते प्या. धण्याचे पाणी चयापचय वाढवते आणि यकृताचे आरोग्य सुधारते.
जिऱ्याचे पाणी
वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी देखील फायद्याचे ठरू शकते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो, पचन सुधारते. याचे नियमित सेवन शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या तुम्ही याचे सेवन करू शकता. जिरे पाणी बनवण्यासाठी एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या. तुम्ही रात्रीही याचे सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.