
तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, एक धक्कायदायक खुलासा करण्यात आलेला आहे तो म्हणजे तुमच्या उशांना देखील एक्सपायरी डेट असते. जसं आपण स्किनकेयर करताना प्रॉडक्टची एक्सपायरी डेट बघतो तसंच तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी उशी वेळच्या वेळी बदलणं देखील तितकंच महत्वाचं आहेे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात खूप वर्षांपासूनच्या उशी वापरत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे.
उशांचे आब्रे नियमितपणे स्वच्छ करण्याबरोबर गरजेचं आहे ते म्हणजे वेळच्य़ा वेळी उशी बदलणं देखील. याबाबत आरोग्यतज्ज्ञ डॉ. मनन वोरा (Dr. Manan Vora) यांनीउशी नियमितपणे बदलली जाणं किती महत्त्वाचं आहे हे सांगतिलं आहे.
धावपळीचं आरोग्य, तणाव, अवेळी जेवण, अनियमित झोपण्याच्या वेळा याबरोबर अपूर्ण झोपेचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचा बेड आणि तुम्ही वापरत असलेली उशी. जर तुमचा बेड आणि उशी खूप खराब असेल तर याचा परिणाम झोपेवर होतोे आणि सतत झोपमोड देखील होते. झोपेच्य़ा समस्येबाबत सांगताना डॉ. वोरा म्हणाले की, तुम्ही वापरत असलेल्या वर्षानुवर्षांच्या उशांना देखील एक्सपायरी डेच असते. या कोणत्या प्रकारच्या उशा किती काळ चांगल्या टिकतात, याबाबत देखील त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. वोरा यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात मिळणाऱ्या उशा कृत्रिमरित्या तयार केल्या जातात. त्यामुळे होतं असं की, एखादी व्यक्ती रात्री झोपताना 7 ते 8 तास उशीच्या संपर्तकात असते. या उशीर केसांवर साचलेली धूळ, स्किनवरील सुटलेलं सिबम ऑईल यामुळे रासायनिक क्रिया तयार होते. तसंच 8 तासांच्या झोपेत व्यक्ती सर्वात जास्त उशीच्या संपर्क हा नाक आणि डोळे यांच्याशी जास्त येतो. त्यामुळे अस्वच्छ बिछान्याचा त्रास मेंदूला होतो आणि मेंदू याबाबत सतत सिग्नल देतो याचकारणाने अनेकदा झोप अपुरी होते किंवा सतत झोपमोड देखील होते. याचमुळे झोपेवर परिणाम होऊन देखील आरोग्य बिघडतं असं संशोधनातून समोर आलं आहे.
कोणत्याही प्रकराच्या उशीचा वापर जास्तीत जास्त 3 ते 5 वर्षांपुढे जास्त काळ वापरु नये. बाजारात अनेक प्रकारच्या उशा मिळतात मात्र पॉलिस्टरची उशी सहसा 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत चांगली टिकते. त्याचबरोबर पक्ष्यांच्या पिसांपासून तयार झालेली उशी 1 ते 3 वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत चांगली राहते. बकव्हीटपासून तयार झालेली उशी सर्वाधिक काळ म्हणजेच 3 ते 5 वर्षांपर्यंत टिकते.