Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुका खोकला, बंद नाकाच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका! बाबा रामदेवांनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, लगेच मिळेल आराम

हिवाळ्यात सर्दी खोकला वाढल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सर्दी खोकला कमी करण्यासाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 08:36 AM
सुका खोकला, बंद नाकाच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका! बाबा रामदेवांनी सांगितलेले 'हे' उपाय ठरतील प्रभावी

सुका खोकला, बंद नाकाच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका! बाबा रामदेवांनी सांगितलेले 'हे' उपाय ठरतील प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:
  • बंद नाकाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?
  • थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला का होतो?
  • हिवाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी? 
हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या ऋतूनुसार जेवणात सुद्धा बदल करणे तितकेच गरजेचे आहे. हवेतील थंडाव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर वारंवार सर्दी, खोकला, नाक बंद होणे, घशात वाढलेली खवखव, नाकातून सतत सर्दी वाहणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. गळा खवखवतो, बोलताना दम लागतो, झोपताना नाक बंद होऊन इत्यादी अनेक समस्या हिवाळ्यात कायमच जाणवू लागतात. धूळ, माती आणि प्रदूषणाचे हानिकारक कण नाक आणि तोंडात गेल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाबा रामदेवांनी सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास श्वासांच्या समस्या, नाक बंद होण्याच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

बदाम, काळी मिरी आणि खडीसाखर:

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर बदाम, काळीमिरी आणि खडीसाखर एकत्र करून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात मिक्स करून प्यावे. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. बदाम खाल्ल्यामुळे शरीराला ताकद मिळते. तर खडीसाखर खाल्ल्यामुळे घशात वाढलेली खवखव दूर होते. काळीमिरीच्या सेवनामुळे शरीरात उष्णता वाढून आरोग्य सुधारते. त्यामुळे नियमित बदाम काळीमिरीच्या मिश्रणाचे दुधासोबत सेवन करावे.

मोहरीचे तेल:

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. मोहरीच्या तेलामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. नाक बंद होणे, सायनसची सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास नाकात मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकावे. यामुळे अँटीबॅक्टेरियल घटक जंतू नष्ट करून टाकतात. नाकातील मार्ग ओलसर कायमच ओलसर राहतो. याशिवाय तुम्हाला जर सायनस, अ‍ॅलर्जी आणि वारंवार होणाऱ्या सर्दीपासून कायमचा आराम मिळवायचा असेल तर नियमित एक किंवा दोन थेंब तेल नाकात टाकावे.

या तीन पैकी कोणत्याही एका ड्रिंकचे नियमित सेवन करा, काचेसारखा चकाकेल चेहरा; शरीरालाही आतून ठेवेल स्वछ

त्रिकुट काढा:

थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या काढ्याचे सेवन करावे. काढ्याच्या सेवनामुळे शरीरत्व साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. काढा बनवण्यासाठी सुंठ, काळी मिरी आणि पिपळी इत्यादी पदार्थांचा वापर करावा. मिक्सरच्या भांड्यात सुंठ, काळी मिरी आणि पिपळी टाकून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर पाण्यात टाकून व्यवस्थित गरम करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध मिक्स करून सेवन करा. यामुळे घशात वाढलेली खवखव कमी होते, कफ पातळ होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात सामान्यपणे कोणते आजार होतात?

    Ans: हिवाळ्यात सामान्यतः सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, दमा, सांधेदुखी आणि श्वसनसंस्थेचे आजार (उदा. न्यूमोनिया) होण्याचा धोका असतो.

  • Que: हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?

    Ans: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात फळे, भाज्या, सुकी फळे (ड्राय फ्रुट्स), आणि कडधान्ये यांचा समावेश करावा. तसेच, पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे.

  • Que: थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी काय खावे?

    Ans: शरीराला उबदार ठेवण्यासाठी डिंक, अळीव (Garden cress seeds), मेथीचे लाडू, खजूर, गूळ, आणि शेंगदाणे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. आले आणि हळदीचा वापर देखील फायदेशीर ठरू शकतो.

Web Title: Permanent relief from dry cough stuffy nose baba ramdev said these solutions will be effective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • Health Care Tips
  • winter health tips

संबंधित बातम्या

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
1

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
3

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान
4

तुम्हाला सुद्धा कच्चा तांदूळ खाण्याची सवय आहे का? मग शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, आतड्यांचे होईल नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.