Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: पावसाळ्यात खोकला-तापाकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतात Pneumoniaची सुरुवातीची लक्षणे, अशी घ्या काळजी

Pneumonia Early Symptoms: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि संसर्गामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे कोणती आणि पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 13, 2026 | 06:44 PM
Health Tips: पावसाळ्यात खोकला-तापाकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतात Pneumoniaची सुरुवातीची लक्षणे, अशी घ्या काळजी
Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात खोकला-तापाकडे दुर्लक्ष करू नका
  • असू शकतात pneumoniaची सुरुवातीची लक्षणे
  • न्यूमोनिया म्हणजे काय?

पावसाळा सुरू होताच वातावरणात आर्द्रता वाढते आणि विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूंचा प्रसार वेगाने होऊ लागतो. अशा परिस्थितीत सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या तक्रारी काही वेळा न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराचे रूप धारण करू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेत उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य काळजी घेतल्यास या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत

न्यूमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्गजन्य आजार आहे. जिवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे फुफ्फुसांमध्ये इन्फ्लेमेशन निर्माण होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होण्याची गरजही भासू शकते.

सुरुवातीची लक्षणे ओळखा

  • सतत किंवा वाढणारा ताप
  • खोकल्यासोबत कफ येणे
  • श्वास घेताना त्रास किंवा धाप लागणे
  • छातीत वेदना जाणवणे
  • थंडी वाजणे आणि अंगदुखी
  • तीव्र अशक्तपणा व थकवा
  • लहान मुलांमध्ये जलद श्वास घेणे किंवा खाण्याची इच्छा कमी होणे

बचावासाठी या महत्त्वाच्या खबरदाऱ्या घ्या

पावसाळ्यात  न्यूमोनियाचा धोका कमी करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर ओले कपडे बदला . हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमाल किंवा कोपराने झाका. गर्दीच्या ठिकाणी आवश्यक असल्यास मास्कचा वापर करा. शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार घ्या, पुरेसे पाणी प्या आणि नियमित, पुरेशी झोप घ्या. धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळा, कारण यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण करून घ्या. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, सतत ताप राहणे किंवा छातीत वेदना जाणवणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वेळेत उपचार का आवश्यक?

न्यूमोनियाकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढून फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपायांवर अवलंबून न राहता लक्षणे कायम राहिल्यास किंवा तीव्र होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहावे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास न्यूमोनियावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: संध्याकाळी ५ नंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

Web Title: Pneumonia symptoms prevention and monsoon health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • health care news
  • Monsoon
  • Pneumonia

संबंधित बातम्या

Health Tips: संध्याकाळी ५ नंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
1

Health Tips: संध्याकाळी ५ नंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

पावसाळ्यात कार आणि बाईकचे ब्रेक्स सुरक्षित ठेवण्याच्या ५ सोप्या टिप्स! जाणून घ्या
2

पावसाळ्यात कार आणि बाईकचे ब्रेक्स सुरक्षित ठेवण्याच्या ५ सोप्या टिप्स! जाणून घ्या

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय
4

High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.