Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल

World Sauntering Day : अलीकडच्या धावळपळीत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे. यश, काम आणि जबाबदाऱ्यांचे ओझे इतके वाढले आहे, याच्या मागे धावण्याच्या नादात माणसाच्या मेंदूवर, मनावर आणि शारिरावरही नकारात्मक परिणाम होत आहे. यातून मानवाला बाहेर काढण्यासाठी जागतिक साँटरिंग डे साजरा केला जातो. साँटरिंग नक्की काय आहे, जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2026 | 07:30 AM
World Sauntering day

World Sauntering day

Follow Us
Follow Us:
  • धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय?
  • मग साँटरिंग करुन पाहा
  • मानसिक शांतता मिळेल
सुनयना सोनवणे : World Sauntering Day : आजच्या धावपळीच्या जगात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. मोबाईलवरील संदेशांना तात्काळ उत्तर द्यायचे, वाहतुकीच्या गर्दीतून धावत कार्यालय गाठायचे, कामाच्या मुदती पूर्ण करायच्या आणि त्याच वेळी सामाजिक आयुष्यही सांभाळायचे. या अखंड धावपळीत माणूस स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी १९ जून रोजी साजरा होणारा ‘जागतिक साँटरिंग डे’ हा आपल्याला एक वेगळाच संदेश देतो आहे जो म्हणजे ‘थोडे थांबा, आजूबाजूला पाहा आणि निवांतपणे चालत जीवनाचा आनंद घ्या.’

‘रक्तदान म्हणजे नवजीवन’ , पुण्यातील ‘या’ व्यक्तीनं केलं १८२ वेळा रक्तदान; तरुणांना दिला महत्वपूर्ण, ‘गिनिज’मध्येही नोंद

सॉंटरिंग म्हणजे काय?

‘साँटर’ म्हणजे घाईगडबड न करता, कोणत्याही स्पर्धेचा विचार न करता निवांतपणे चालणे. हा दिवस १९७९ मध्ये अमेरिकेतील मिशिगन राज्यातील मॅकिनॅक आयलंड येथे जनसंपर्क तज्ज्ञ डब्ल्यू. टी. राबे यांनी सुरू केला. त्या काळात जॉगिंग आणि वेगवान व्यायाम प्रकारांची लोकप्रियता वाढत होती. त्याला पर्याय म्हणून जीवनातील साध्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्गाशी नाते जोडण्यासाठी त्यांनी ‘साँटरिंग’ची संकल्पना पुढे आणली. आज या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

मानसिक आरोग्याच्या समस्यांचे वाढते प्रमाण

भारतात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालानुसार, देशातील सुमारे १० ते ११ टक्के नागरिकांना आयुष्यात कधीतरी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, १५ कोटींहून अधिक नागरिकांना मानसिक आरोग्य सेवांची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, देशातील ५.६ कोटी नागरिक नैराश्याने तर ३.८ कोटी नागरिक चिंताविकाराने प्रभावित आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संशोधनांमध्ये ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी निवांत चालणे हा मानसिक आरोग्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो. चालताना मन शांत होते, विचारांची गर्दी कमी होते आणि शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. विशेषतः उद्याने, झाडांनी नटलेले रस्ते किंवा निसर्गरम्य ठिकाणी फेरफटका मारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अधिक जाणवतो.

तज्ज्ञांचे मत

डॉ. शुभांगी तेरकर, जनरल फिजिशियन सांगतात, ‘तंत्रज्ञानाच्या युगात माणूस जगाशी जोडला गेला असला तरी स्वतःपासून दूर जात असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. त्यामुळे जागतिक साँटरिंग डे हा केवळ चालण्याचा दिवस नाही, तर स्वतःशी संवाद साधण्याची, निसर्गाशी नाते दृढ करण्याची आणि मानसिक शांतता शोधण्याची संधी आहे. कदाचित काही किलोमीटर धावण्यापेक्षा काही मिनिटे निवांत चालणेच आपल्याला अधिक समाधान आणि आनंद देऊ शकते.’

World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार

Web Title: World sauntering day mental health simple mantra for inner peace in busy life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • Health News
  • Healthy life
  • mental health

संबंधित बातम्या

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
1

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
3

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
4

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.