Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोग आणि भाजप संगनमताने निवडणुकांची चोरी करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुका, हरियाणा निवडणुका, मध्य प्रदेशच्या निवडणुका चोरल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 19, 2025 | 08:10 PM
Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये निघालेल्या मतदार हक्क यात्रेला गेल्या तीन दिवसांत मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. खासदार राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सुरू असलेले विशेष सघन पुर्नपडताळणी (SIR) विरोधात आणि मतचोरी बाबत निवडणूक आयोग आणि भाजपवर केलेल्या आरोपांविरोधात मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. आज (१९ ऑगस्ट) ही यात्रा बिहारच्या नवादा येथे पोहचली. याठिकाणी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा आरोप केला. याचवेळी महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये झालेल्या फेरफारीकडेही केले

सैदपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील तरुण त्यांची मते चोरून देतील का, नाही. कारण मतदान हा आमचा हक्क आहे. आजच्या भारतात गरिबांकडे फक्त तुमचे मत उरले आहे. जर तेही हरवले तर तुमचे सर्वस्व जाईल. तुमची जमीन, रेशन कार्ड, सर्वस्व जाईल. गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोग आणि भाजप संगनमताने निवडणुकांची चोरी करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुका, हरियाणा निवडणुका, मध्य प्रदेशच्या निवडणुका चोरल्या आहेत. महाराष्ट्रात आपण लोकसभा निवडणूक जिंकलो आणि चार महिन्यांनंतर, जेव्हा विधानसभा निवडणुका होतात तेव्हा भाजप जिंकतो.

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

‘महाराष्ट्रात १ कोटी मतदारांना फरक आढळला’

पण आमच्या टीमने केलेल्या पडताळणीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत १ कोटी मतदारांचा फरक दिसला. लोकसभा निवडणुकीत याच १ कोटी मतदारांनी आम्हाला मतदान केले असताना विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही. जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की हे १ कोटी लोक कोण आहेत, तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी दाखवण्याची मागणी केली. पण त्यांनी तीही दाखवण्यास नकार दिला. आम्ही त्यांना मतदान केंद्रांवरील सीसीटिव्ही फुटेज मागितले, पण त्यांनी तेही देण्यास नकार दिला. त्यांनी कोणत्याही प्रकारे आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाही, म्हणजेच निवडणूक आयोग मते चोरून घेत आहे.

‘जनता स्वतः निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागेल’

कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात आम्ही चौकशी केली असता, एका विधानसभेत तब्बल १ लाख बनावट मतदार असल्याचे आढळले, असा आरोप राहुल गांधींनी केला. “भाजप निवडणूक हरत होती, पण या बनावट मतांमुळे ती जिंकली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता, आयोग आम्हालाच प्रतिज्ञापत्र मागतो.  आमच्याकडून नव्हे, जनताच निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागणार आहे. बिहारचे लोक मतांची चोरी होऊ देणार नाहीत.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर

“बिहारचे सत्य बाहेर येईल”

राहुल गांधी म्हणाले, “बिहारच्या विकासाचा प्रश्न आहे. नितीशकुमार यांचे सरकार २० वर्षांपासून आहे. एक दिवस हेही समोर येईल की त्यांनी बिहारची शेवटची निवडणूक चोरली होती. जेव्हा ते सत्य बाहेर येईल, तेव्हा आम्ही कारवाई करू. रोजगार मिळत नाही, बनावट वीजबिले दिली जात आहेत, महागाई वाढते आहे. बिहारमधून ६५ लाख मतदारांना वगळले जात आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. यासाठीच आम्ही हा प्रवास सुरू केला आहे.”

 

Web Title: 1 crore stolen in maharashtra 1 lakh stolen in karnataka rahul gandhis attack on aayog again in bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
1

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
2

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
3

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
4

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.