धक्कादायक! गरबा खेळताना १७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गरबा खेळता खेळताच त्याला अस्वस्ठ वाटू लागलं आणि तो तरुण भोवळ येऊन खाली पडला. त्यालसा रुग्णालयात नेलं असता डॅाक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

     सध्या देशभरात नवरात्रोत्सव रंगात आला आहे. सगळीकडे गरबाची धूम सुरू असताना गुजरातमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. गुजरातमधील कपडवंज खेडा जिल्ह्यात गरबा खेळताना एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Boy Died While Playing Garba) झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. गरबा खेळताना अचानत तो चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. डॅाक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
    डॉ. आयुष पटेल यांनी सांगितले की, 17 वर्षांचा वीर शाह कपडवंजच्या गरबा मैदानात गरबा खेळत होता. यावेळी त्यांना चक्कर आल्याचे जाणवले. तो बेशुद्ध पडला. आम्ही त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांचे निरीक्षण केले, पण नाडी काम करत नव्हती. कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. श्वासोच्छवासाची कोणतीही चिन्हे नव्हती. त्यांना कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) च्या तीन सायकल देण्यात आल्या. आम्ही त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. मात्र, त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

    कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर

    त्याच्या निधनामुळे वीर शहा यांच्या गावात शोककळा पसरली आहे. वीरचे वडील रिपाल शहा यांना या घटनेची माहिती नव्हती. त्यांना फोन करून मुलाच्या निधनाची माहिती देण्यात आली. कपडवंज येथील दुसऱ्या गरबा मैदानावर रिपल शाह आणि त्यांची पत्नी नवरात्रोत्सवात सहभागी होत असताना हा अपघात झाला.
    मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांना मोठा धक्का बसला. रडत रडत रिपल शाहने गरबा खेळणाऱ्यांना काळजी घेण्यास सांगितले. “विश्रांती घेतल्याशिवाय सतत गरबा खेळू नका. आज मी माझे मूल गमावले आहे आणि अशी घटना इतर कोणावरही घडू नये अशी माझी इच्छा आहे,” असे तो म्हणाला.
    वीर शहा यांचे निधन झालेल्या मैदानात आयोजित गरबा पुढे ढकलण्यात आला आहे. कापडवंज शहर आणि परिसरातील सर्व गरबा आयोजकांनी उत्सवाचे सर्व नियोजित कार्यक्रमही एक दिवसासाठी थांबवले आहेत.