Kurkure Chaat Recipe : मागील काही काळापासून क्रस्पी कुरकुरे चाट खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. पार्टी स्नॅक किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते. शिवाय अवघ्या पाच मिनिटांतच ही चाट बनून तयार होते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही हटके होऊन जाऊद्यात.
घरी बनवा टेस्टी आणि कुरकुरीत कुरकुरे चाट.
याची चव घरातील सर्वांनाच करेल खुश.
कुरकुरीत, चटपटी आणि झटपट तयार होणारी चाट खाण्याची इच्छा झाली की कुरकुरे चाट हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्या, चटण्या आणि मसाल्यांच्या मदतीने ही चाट काही मिनिटांत तयार करता येते. कुरकुरे, कांदा, टोमॅटो आणि शेव यामुळे या चाटला वेगवेगळ्या चवी आणि टेक्सचरचा सुंदर मेळ मिळतो. याची चटकदार आणि क्रिस्पी चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते. संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा घरच्या घरी काहीतरी वेगळे खायचे असेल तर ही रेसिपीनक्की करून पाहा. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.