Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचे मोठे यश, इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; सरकारचं ‘ऑपरेशन अजय’ सुरु

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केलेल्या 'ऑपरेशन अजय' अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2023 | 08:41 AM
भारत सरकारचे मोठे यश, इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; सरकारचं ‘ऑपरेशन अजय’ सुरु
Follow Us
Follow Us:

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे.

मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक

खरं तर, ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांना परत आणले जाणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. दरम्यान, भारतात येणार्‍या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

Web Title: 212 indians repatriated from israel major success of indian government governments operation ajay started nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 08:40 AM

Topics:  

  • india
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
1

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
2

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
3

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
4

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.