Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

पनवेल शाखेतर्फे १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 01:49 PM
Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

Follow Us
Follow Us:
  • पनवेल शाखेतर्फे यंदा तब्बल १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार
  • प्रत्येक बॉक्समध्ये चार ड्रायफ्रूट लाडू, चार चकल्या, १२५ ग्रॅम चिवडा आणि शंकरपाळी समाविष्ट
  • अरुणाचल प्रदेशातील तवांग तसेच लेह, लडाख आणि सियाचीन येथील दुर्गम भागांत तैनात असलेल्या जवानांसाठी पनवेलमधील रहिवाशांची खास भेट
पनवेल: दिवाळीच्या काळात आपल्या कुटुंबांपासून दूर राहून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी पनवेलमधील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. भारत विकास परिषद, पनवेल शाखेतर्फे यंदा तब्बल १८ हजार जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, फराळाचे बॉक्स तयार करण्यासाठी स्वयंसेवक आणि नागरिकांची लगबग सुरू आहे.

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

१८ हजार फराळाचे बॉक्स तयार केले जात आहेत

मागील वर्षी १६ हजार ५०० जवानांपर्यंत फराळ पोहोचवण्यात आला होता. यंदा या उपक्रमाचा विस्तार करून १८ हजार फराळाचे बॉक्स तयार केले जात आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये चार ड्रायफ्रूट लाडू, चार चकल्या, १२५ ग्रॅम चिवडा आणि शंकरपाळी यांचा समावेश आहे. फराळ सुरक्षितपणे जवानांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रत्येकी २० बॉक्स एका मोठ्या मास्टर बॉक्समध्ये पॅक केले जात आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पॅकिंग

अरुणाचल प्रदेशातील तवांग तसेच लेह, लडाख आणि सियाचीन येथील दुर्गम भागांत तैनात असलेल्या जवानांपर्यंत हा फराळ पोहोचवण्यात येणार आहे. अतिउंचीवरील आणि प्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी टिकाऊ फराळाचे पेंकिग काळजीपूर्वक केले जात आहे.

शुभेच्छांसोबत आपुलकीचा संदेश

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फराळासोबत जवानांना हस्तलिखित शुभेच्छापत्रेही पाठवली जाणार आहेत. शाळकरी मुले, महिला आणि नागरिकांनी मराठी व हिंदी भाषेत जवानांसाठी शुभेच्छा संदेश लिहिले आहेत. काही पत्रांमध्ये कविता आणि भावनिक संदेशांचाही समावेश आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छांसोबत आपुलकीचा संदेश पोहोचवण्याचा यामागील उद्देश आहे.

Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

सैनिकांप्रति असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक

“सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. फराळ मिळाल्यानंतर जवानांना होणारा आनंद ते छायाचित्रे, व्हिडिओ आणि पत्रांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यातून स्वयंसेवकांनाही पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते,” असे भारत विकास परिषदेच्या कोकण, मुंबई व गोवा महिला विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. कीर्ती समुद्रा यांनी सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Panvel residents prepare 18000 diwali faral boxes for soldiers guarding the nations borders hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • panvel
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
1

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
2

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
3

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
4

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.