Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी चिमूर जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला भेट देत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 02:09 PM
Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांच्या सुविधा, भोजन व्यवस्था आणि शाळेतील वातावरणाची पाहणी
  • निवास व्यवस्था आणि दैनंदिन अडचणींबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद
  • अर्धमुंडण कटिंगच्या फोटोचे गूढ अद्याप कायम
चिमूर जांभूळघाट येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अर्धमुंडण केस कर्तनाच्या फोटोने निर्माण केलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अपर आयुक्त आयुषी सिंग यांनी आश्रमशाळेत धडक देत व्यवस्थेची झाडाझडती घेतली. विद्यार्थ्यांच्या सुविधा, भोजन व्यवस्था आणि शाळेतील वातावरणाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे, पाहणीदरम्यान एका विद्यार्थिनीने मॅडम, आमच्यासोबत जेवण करा, असा आग्ग्रह धरला. विद्यार्थिनीच्या या आपुलकीच्या आग्रहाला मान देत अपर आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबतच भोजन केले.

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

भोजनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, निवास व्यवस्था आणि दैनंदिन अडचणींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यामुळे प्रशासनाने आश्रमशाळेची केवळ कागदोपत्री माहिती न घेता प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. आश्रमशाळेतील अंतर्गत गटबाजीचा मुद्दाही यावेळी गंभीरपणे घेण्यात आला. शाळेतील अंतर्गत वाद बाजूला ठेवून येत्या पंधरा दिवसात सर्वांनी एकत्रितपणे कामकाज करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि सज्जड इशारा अपर आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील अंतर्गत कलहाला आता प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

विद्यार्थ्यांसोबत भोजन; पण प्रश्न कायम

एका बाजूला अपर आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन करून त्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाचा संवेदनशील चेहरा दाखविला; तर दुसऱ्या बाजूला अर्धवट कटिंगचा फोटो बाहेर जाण्याचे गूढ आणि शाळेतील अंतर्गत गटबाजीचे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे आता चौकशीत फोटोचे ‘कनेक्शन’ कुठे जाऊन थांबते आणि पंधरा दिवसांत शाळेतील वातावरण किती बदलते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

तो फोटो बाहेर गेला कसा-आयुक्तांचा सवाल

दरम्यान, अर्धमुंडण कटिंगच्या फोटोचे गूढ अद्याप कायम आहे. ३ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांचे केस कर्तन सुरू असतांना ट्रिमरची बॅटरी संपल्याने काही विद्यार्थ्यांची कटिंग अपूर्ण राहिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच अवस्थेतील विद्यार्थ्यांचा फोटो मोबाईलमधून बाहेर जाऊन थेट माध्यमांपर्यंत पोहोचल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

फोटो कोणी काढला? कोणाच्या मोबाईलमधून तो बाहेर गेला? तो माध्यमांपर्यंत नेमका कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे आता शोधण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन फोटो काढणाऱ्या तसेच प्रसारित करणाऱ्या व्यक्तीची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई झाल्यानंतर आता फोटो प्रसारित करणाऱ्या शिक्षकाची भूमिका काय होती? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Aayushi singh inspects jambhulghat tribal ashram school eats with students amid half shaved hair controversy hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार
1

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
2

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
3

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
4

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.