Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trains Cancelled: प्रवाशांनो लक्ष द्या! १ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ गाड्या रद्द; जाणून घ्या काय आहे कारण

Indian Railway: भारतीय रेल्वेने दाट धुक्यामुळे (Fog) होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन उत्तर भारतातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ५२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 19, 2025 | 03:00 PM
प्रवाशांनो लक्ष द्या! १ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ गाड्या रद्द (Photo Credit- X)

प्रवाशांनो लक्ष द्या! १ डिसेंबर ते ३ मार्च दरम्यान २४ गाड्या रद्द (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर भारत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी अत्यावश्यक सूचना!
  • रेल्वेने २४ गाड्या पूर्णपणे रद्द केल्या
  • तर २८ गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात
Indian Railways: तुम्ही जर रेल्वे प्रवासी असाल आणि तुमचं दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश किंवा बिहार यांसारख्या राज्यांमध्ये वारंवार येणं-जाणं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) दाट धुक्यामुळे (Fog) होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन उत्तर भारतातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ५२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणामुळे घेतला निर्णय?

वाढत्या थंडीमुळे धुक्याची चादर अधिक दाट होत आहे, ज्यामुळे दृश्यमानता (Visibility) खूप कमी होते. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा तपशील:

  • पूर्णपणे रद्द केलेल्या गाड्या: २४ गाड्यांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
  • फेरे कमी केलेल्या गाड्या: २८ गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

कधीपासून कधीपर्यंत लागू राहील हा निर्णय?

हा निर्णय १ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार असून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू राहील (जवळपास ३ महिने). या दरम्यान, जर तुम्ही या मार्गांवर प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर वेळापत्रक तपासूनच तयारी करा.

कोणते मार्ग सर्वाधिक प्रभावित?

या निर्णयामुळे दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांचे रेल्वे प्रवासी प्रभावित होतील.

प्रभावीत होणारे प्रमुख मार्ग (Routs)

पटना, प्रयागराज, हावडा, अमृतसर, कामाख्या, कोलकाता, अजमेर आणि अंबाला यासह अनेक महत्त्वाच्या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पूर्णपणे रद्द झालेल्या गाड्यांची यादी (List of Trains fully cancelled):

गाडी क्रमांक (Train No.) नाव (Name) रद्द कालावधी (Cancellation Period)
१४११२ प्रयागराज जं.-मुजफ्फरपूर एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २५.०२.२६
१४१११ मुजफ्फरपूर-प्रयागराज जं. एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २५.०२.२६
२२१९८ वीरांगना लक्ष्मीबाई (झांसी)-कोलकाता एक्सप्रेस ०५.१२.२५ ते २७.०२.२६
२२१९७ कोलकाता-वीरांगना लक्ष्मीबाई (झांसी) एक्सप्रेस ०७.१२.२५ ते ०१.०३.२६
१२३२७ हावडा-देहरादून उपासना एक्सप्रेस ०२.१२.२५ ते २७.०२.२६
१२३२८ देहरादून-हावडा उपासना एक्सप्रेस ०३.१२.२५ ते २८.०२.२६
१४००३ मालदा टाउन-नवी दिल्ली एक्सप्रेस ०६.१२.२५ ते २८.०२.२६
१४००४ नवी दिल्ली-मालदा टाउन एक्सप्रेस ०४.१२.२५ ते २६.०२.२६
१४५२३ बरौनी-अंबाला हरिहर एक्सप्रेस ०४.१२.२५ ते २६.०२.२६
१४५२४ अंबाला-बरौनी हरिहर एक्सप्रेस ०२.१२.२५ ते २४.०२.२६
१४६१७ पूर्णिया कोर्ट-अमृतसर जनसेवा एक्सप्रेस ०३.१२.२५ ते ०२.०३.२६
१४६१८ अमृतसर-पूर्णिया कोर्ट जनसेवा एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २८.०२.२६
१५९०३ दिब्रुगढ-चंडीगढ एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २७.०२.२६
१५९०४ चंदीगढ-दिब्रुगढ एक्सप्रेस ०३.१२.२५ ते ०१.०३.२६
१५६२० कामाख्या-गया एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २३.०२.२६
१५६१९ गया-कामाख्या एक्सप्रेस ०२.१२.२५ ते २४.०२.२६
१५६२१ कामाख्या-आनंद विहार एक्सप्रेस ०४.१२.२५ ते २६.०२.२६
१५६२२ आनंद विहार-कामाख्या एक्सप्रेस ०५.१२.२५ ते २७.०२.२६
१२८७३ हटिया-आनंद विहार एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २६.०२.२६
१२८७४ आनंद विहार-हटिया एक्सप्रेस ०२.१२.२५ ते २७.०२.२६
२२८५७ संतरागाछी-आनंद विहार एक्सप्रेस ०१.१२.२५ ते ०२.०३.२६
२२८५८ आनंद विहार-संतरागाछी एक्सप्रेस ०२.१२.२५ ते ०३.०३.२६
१८१०३ टाटा-अमृतसर एक्सप्रेस ०१.१२.२५ ते २५.०२.२६
१८१०४ अमृतसर-टाटा एक्सप्रेस ०३.१२.२५ ते २७.०२.२६

लाज सोडली…! बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की… Video Viral

Web Title: 24 trains cancelled between december 1 and march 3 know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Indian Railways
  • Nation News
  • Train

संबंधित बातम्या

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य
1

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये
2

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.