सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली होती. आता 5G सेवा देशातील 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 50 शहरांमध्ये सुरू झाली आहे. तसेच राज्यातील 33 जिल्ह्यात ही सेवा मिळत आहे. दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरातच 5G नेटवर्कचे उद्धघाटन झाले आहे. या शहराच्या परिघाबाहेर उर्वरीत राज्यात 5G नेटवर्क नाही. तर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, भावनगर, मेहसाणा, राजकोट, सूरत, वडोदरा, अमरेली, बोटाद, जूनागढ, पोरबंदर, वेरावल, आनंद, भरुच, पालनपूर, नवसारी अशा एकूण 33 जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध आहे.
मुंबई, चेन्नई, बेंगळुरु या सारख्या शहरात 5G नेटवर्कची सुरुवात झाली आहे. सध्या देशातील 14 राज्ये आणि केंद्री शासित प्रदेशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. बुधवारी दूरसंचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान यांनी संसदेत या विषयीची माहिती दिली.
उत्तर भारतातील राज्यातील एखाद-दोन शहर वगळता ही सेवा अद्याप कुठेच पोहचलेली नाही. त्यामुळे एकट्या गुजरात राज्यातच 5G नेटवर्कचा कसा विस्तार झाला हे मोठं कोड आहे. त्यासाठी त्या राज्याने काय पायाभूत सुविधा पुरविल्या हा संशोधनाचा विषय आहे.
दूरसंचार ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 पर्यंत देशातील 6,44,131 गावांतील जवळपास 6,05,230 गावांमध्ये मोबाईलची कनेक्टिविटी आहे. तर 38,901 गावांच्या हद्दीत अद्याप इंटरनेटचे नेटवर्क पोहचलेले नाही.
आदिवासी विभागात अद्यापही मोबाईल नेटवर्क अथवा इंटरनेट पोहचलेले नाही. 25 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 1,20,613 गावांतील जवळपास 1,00,030 गावात मोबाईल नेटवर्क आहे. तर 20,583 गावांमध्ये नेटवर्कची रेंज नाही