Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana News: तेलंगणामध्ये मोठा अपघात, बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ६ कामगार अडकले

SLBC tunnel project collapses in Telangana : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात एक मोठा बोगदा अपघात झाला आहे. येथे बोगद्याचा एक भाग कोसळल्याने सहा कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 22, 2025 | 05:44 PM
तेलंगणामध्ये मोठा अपघात, बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ६ कामगार अडकले (फोटो सौजन्य-X)

तेलंगणामध्ये मोठा अपघात, बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ६ कामगार अडकले (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

SLBC tunnel project collapses in Telangana News Marathi: तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात एक मोठा बोगदा अपघात झाला आहे. येथे बोगद्याचा एक भाग कोसळल्याने सहा कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. कामगारांना वाचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या, अडकलेल्या कामगारांची संख्या सहा आहे की आठ हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या (एसएलबीसी) बांधकामाधीन भागात शनिवारी हा अपघात झाला. येथे कालव्याच्या छताचा एक भाग कोसळला. बांधकाम कंपनीची टीम मूल्यांकनासाठी बोगद्याच्या आत गेली आहे आणि पडताळणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ कामगार अडकल्याची भीती आहे.

Air India च्या तुटलेल्या अन् पाण्यात बुडालेल्या सीटवरुन प्रवास; केंद्रीय मंत्र्यांनी टाटा समूहाला सुनावले खडेबोल

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले

या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, राज्याचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, पाटबंधारेविषयक सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर पाटबंधारे अधिकारी एका विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

बचाव कार्य सुरू

अपघाताबाबत एसपी म्हणाले की, सिंचन प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपनीच्या दोन बचाव पथकांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोगद्यात प्रवेश केला आहे. हे ठिकाण बोगद्याच्या आत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर आहे. बचाव पथके बाहेर आल्यानंतरच परिस्थितीचे गांभीर्य आपल्याला कळेल.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जिल्हाधिकारी, अग्निशमन विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट करून अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या

या अपघातावर चिंता व्यक्त करताना केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी अपघाताच्या कारणांची माहिती मागितली आणि अधिकाऱ्यांना अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सांगितले. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

Sharad Pawar : “ते एक मत मिळालं अन् वाजपेयींचं सरकार कोसळलं”; शरद पवारांनी सांगितला खास किस्सा

Web Title: 6 workers feared trapped as section of roof in slbc tunnel project collapses in telangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • Hyderabad
  • india
  • Telangana

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
2

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
4

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.