Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…

Khelo India Youth Games 2026: खेलो इंडिया युथ गेम्स २०२६ च्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सोमवारी या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2026 | 02:33 PM
11 to 22 december 2026

11 to 22 december 2026

Follow Us
Follow Us:
  • खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 च्या तारखा जाहीर 
  • क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांनी केली घोषणा 
  • 11 ते 22 डिसेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा 
Khelo India Youth Games 2026: गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळाडूंसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच देशात खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी याच घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. आज या स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स २०२६ च्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सोमवारी या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा तेलंगणा राज्यात होणार आहे. तेलंगण या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे.

Sports News: ‘खेलो इंडिया’मुळे खेळ पोहोचला गावागावात; ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी – मुख्यमंत्री फडणवीस

खेलो इंडिया युथ गेम्सच्या माध्यमातून देशातील नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळते. तेलंगणा राज्याला पहिल्यांदाच या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यामुळे राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार करण्यासाठी आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तरुण खेळाडू तयार करण्यात ‘खेलो इंडिया’ उपक्रमाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. तेलंगणा सरकार आणि क्रीडा प्रशासन या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज झाले आहे.

ही क्रीडा स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर 2026 दरम्यान तेलंगणा राज्यात होणार आहे. या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६,००० खेळाडू आणि 1800 सपोर्ट स्टाफ सहभागी होणार असल्याचे समजते आहे. या स्पर्धे एकूण 27 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे देशातील नवोदित खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ निर्माण होणार आहे.

या स्पर्धेतील सामने तेलंगणा राज्यातील हैदराबाद आणि विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. बशीरबाग येथील ‘लाल बहादूर शास्त्री स्टेडियम कॉम्प्लेक्स’ आणि ‘मॉडर्न गच्चीबाउली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ येथे काही सामने होणार आहेत.

Kho-Kho Tournament : खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या खो-खोपटूंची कसोटी; 6 नोव्हेंबरला निवड चाचणी

हनुमानकोंडा – ॲथलेटिक्स
महबूबनगर-  कबड्डी
निजामाबाद – टेबल टेनिस
खम्मम – तीरंदाजी
करीमनगर – ज्युडो

कोणते 27 खेळ प्रकार असणार? 

ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फेन्सिंग (तलवारबाजी), फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युडो, रोइंग (नौकायन), शूटिंग, स्विमिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि रेसलिंग, तीरंदाजी , कबड्डी, खो-खो, मल्लखांब, योगासन, गतका, कलारीपयट्टू आणि थांग-टा

💡

Frequently Asked Questions

  • Que: खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 स्पर्धा कुठे होणार आहे?

    Ans: खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 तेलंगणा राज्यात होणार आहे.

  • Que: खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 कधी होणार आहे?

    Ans: खेलो इंडिया यूथ गेम्स 2026 11 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

Web Title: Mansukh mandviya announced khelo india youth games 226 telangana 27 sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Khelo India tournament
  • Sports News
  • Telangana

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळच्या शासकीय सदस्यांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांकडून आंदोलनाची हाक
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळच्या शासकीय सदस्यांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांकडून आंदोलनाची हाक

Relay Race: राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी; रिलेमध्ये चार पदकांसह घवघवीत यश
2

Relay Race: राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी; रिलेमध्ये चार पदकांसह घवघवीत यश

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क
3

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक
4

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.