Air India News Update: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा वळवली जात आहेत. या सगळ्यात, एअर इंडियाने शुक्रवारी ८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअरलाइनने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने या उड्डाणे रद्द केली आहेत.
दुबई ते चेन्नई – AI906
दिल्ली ते मेलबर्न – AI308
मेलबर्न ते दिल्ली – AI309
दुबई ते हैदराबाद – AI2204
पुणे ते दिल्ली -AI874
अहमदाबाद ते दिल्ली -AI456
हैदराबाद ते मुंबई -AI-2872
चेन्नई ते मुंबई -AI571
MNS Politics: मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं
एअर इंडिया एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा किंवा अपडेटसाठी ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन केलं आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या विमानांची वाढती तपासणी, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि खराब हवामान यामुळे आम्हाला काही व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्याची प्रवाशांना योग्यरित्या माहिती दिली जाईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती airindia.com वर तपासावी किंवा आमच्या ग्राहक सेवा क्रमांक 011 69329333, 011 69329999 वर कॉल करावा.’
गुरुवारीच्या सुरुवातीला, एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाकडून 21 जून ते 15 जुलै 2025 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कमी केली जातील, आणि तीन मार्गांवरील ऑपरेशन तात्पुरते स्थगित केली जातील.
रविवारनंतर सोमवारच का येतो? मंगळवार किंवा शनिवार न येण्यामागील काय आहे ज्योतिषशास्त्रीय कारण
एअर इंडियाकडून वारंवार उड्डाणे रद्द करणे, एअरलाइन्ससाठी धोकादायक मानले जात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्याअहमदाबाद-लंडन गॅटविक ड्रीमलाइनर अपघातातून अद्यापही एअरलाइन्स सावरलेली नाही. या अपघातात २७१ लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये जमिनीवर काम करणाऱ्या किमान ३० लोकांचा मृत्यू झाला. खरं तर, रहिवासी भागात विमान कोसळ्याने मोठी जिवीतहानी झाली. या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याची व्यापक सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
DGCA च्या आकडेवारीनुसार, अपघातानंतर ६६ हून अधिक ड्रीमलाइनर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. फक्त १२ जून रोजी, ड्रीमलाइनरने चालवलेल्या ५० पैकी सहा उड्डाणे ग्राउंड करण्यात आली होती. १८ जूनपर्यंत, एअर इंडियाच्या ३३ ड्रीमलाइनर्सपैकी २४ विमानांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात आणखी विमानांची तपासणी केली जाणार आहे, याची नियामक संस्थेने पुष्टी केली होती. देखभालीच्या समस्यांमुळे सध्या दिल्लीत दोन विमाने AOG (जमिनीवर विमान) म्हणून सूचीबद्ध आहेत.