फोटो सौजन्य- pinterest
हिंदू परंपरेमध्ये विचार करुन बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत. यामागे सुसंगत, निरीक्षण, सारासार विचार, निसर्गचक्र, विज्ञान यांची सांगड प्रामुख्याने घातलेली असते. बऱ्याचदा आपल्या मनात असा विचारही येऊन गेला असेल की रविवारनंतर सोमवारच का येतो गुरुवार का येत नाही. हे चक्र आज्ञा प्रमाण म्हणून ते वर्षा मागून वर्षे चालत आले, असे नाहीये. या मागे काही सुसंगत विचार आहेत.
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे एकूण आठवड्याचे 7 दिवस असतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का रविवार नंतर सोमवारच का येतो. मंगळवार किंवा शनिवार का येत नाही किंवा इतर वार का येत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहेत का? आठवड्याची सुरुवात रविवारने होऊन शनिवारी संपते. मात्र या आठवड्यामध्ये रविवारच पहिला का? रविवारनंतर गुरुवार किंवा इतर वार का येत नाही ते जाणून घेऊया.
रविवारनंतर सोमवार येणे, सोमवारनंतर मंगळवार येणे, मंगळवारनंतर बुधवार येणे असे आठवड्याची सातही वारांची रचना केलेली आहे. मात्र, रविवारनंतर सोमवार येण्याचे कारण म्हणजे सूर्य हा सर्वात मोठा ग्रह असल्याने रविवार हा पहिला येतो, अशा मान्यतेमुळे आठवड्यामध्ये रविवार हा पहिला येतो. आपल्या ग्रहांमध्ये पाहिले गेले तर 7 ग्रह आहे पण प्रत्यक्षात पाहिले गेले तर एकूण ग्रहांची संख्या 9 आहे. ग्रहांच्या आकारानुसार त्यांचे क्रम पाहिले गेल्यास सूर्य आकाराने सर्वांत पहिला येत असल्याने आठवड्यामध्ये रविवार हा पहिला वार येतो. दुसरा सर्वांत मोठा ग्रह गुरु मानला गेला आहे त्यामुळे रविवारनंतर गुरुवार येईला पाहिजे. तिसरा सर्वात मोठा ग्रह शनि असल्याने गुरुवारनंतर शनिवार येईला पाहिजे. परंतु आपण ग्रहांच्या दृष्टीने पाहिल्यास बुध ग्रह सूर्याजवळ आहे, तर बुधवार रविवारनंतर आला पाहिजे. मग असे घडताना दिसत नाही.
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एका गोष्टीला होरा असे म्हटले जाते. म्हणजेच ग्रीक शब्द “होरोस्कोपिक” हा शब्द “होरा” या शब्दापासून होराची उत्पत्ती झाली आहे असे समजले जाते. याचा अर्थ कुंडली असाही होतो.
कुंडलीनुसार असे म्हटले जाते की, होरा सूर्याचा असेल, तर 24 तासानंतर जेव्हा 25 वा तास सुरू होतो, तेव्हा तो चंद्राचा होरा असतो. म्हणजेच, जेव्हा दुसऱ्या दिवशी पहिला होरा सुरू होईल, तेव्हा तो चंद्राचा होरा असेल. यानंतर चंद्राच्या होरानंतर सुरू होणारा 25 वा तास म्हणजेच तिसऱ्या दिवशीचा पहिला तास, मंगळाचा होरा असेल. त्याचप्रमाणे, जेव्हा मंगळाचा होरा संपेल आणि 25 वा तास सुरू होईल, तेव्हा तो बुधाचा होरा असेल, म्हणजेच चौथ्या दिवसाचा पहिला तास गुरूचा असेल.
ज्योतिषशास्त्रामध्ये होरा वर मोजून आठवड्याचे दिवस ठरवले गेले आहेत असे दिसून येते. जसे की, प्रथम सूर्य, नंतर चंद्र, नंतर बुध, नंतर गुरु, शुक्र आणि शनि आहे, त्याच क्रमाने आठवड्याचे हे 7 दिवस येतात – रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार.
ज्यावेळी प्रत्येकाच्या घरी नवग्रहांची शांती केली जाते तेव्हा पंडितजी मंत्रांचे पठन करताना आपण ऐकले असाल. ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकरी भानु: शशि भूमिसुतो बुधश्च ऐकले आहे. गुरुश्च शुक्रः शनि राहुकेतवः सर्वेग्रहः शांतिकारा भवन्तु । असा मंत्रही पहिल्या वेळीस म्हटला जातो. यानंतर भानु म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, भूमी सूतो म्हणजे पृथ्वीचा पुत्र मंगळ, नंतर बुध, नंतर गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू. जर आपण यानुसार क्रम पाहिल्यास आठवड्याचा पहिला वार रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा प्रकारे येतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)