Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन

Maharashtra Politics- आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासंबंधी नवी नियमावली करण्यात आली आहे. तसेच, सेफ्टी ऑडिटचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयांच्या रचनेत आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील, असेही कदम यांनी नमूद केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 27, 2026 | 06:57 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

 राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार

मुंबई : पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या ६ महिन्यांत हे ऑडिट पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पळ काढल्याच्या घटना वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे. पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे.

The liveblog has ended.
  • 27 Feb 2026 06:56 PM (IST)

    27 Feb 2026 06:56 PM (IST)

    किल्ले पुरंदर परिसरात ४ मार्च रोजी प्रवेशबंदी

    पुणे:  हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक किल्ले पुरंदर परिसरात बुधवार, दि. ४ मार्च रोजी तात्पुरती प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी, सेना प्रशिक्षण केंद्र, पुरंदर यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.
  • 27 Feb 2026 06:42 PM (IST)

    27 Feb 2026 06:42 PM (IST)

    ‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

    Skoda Auto Volkswagen India Private Limited (SAVWIPL) ने पुण्यातील चाकण येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात नवीन Škoda Kushaq चे उत्पादन सुरू केले आहे. ग्रुपच्या “Make in India, for India and the World” या धोरणानुसार तयार करण्यात आलेली ही एसयूव्ही भारतीय तसेच जागतिक बाजारातील ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे.

  • 27 Feb 2026 06:36 PM (IST)

    27 Feb 2026 06:36 PM (IST)

    IND vs WI: सावधान Team India! वेस्ट इंडिजला हलक्यात घेण्याची चूक नको; १० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ जखमा आजही ताज्या

    T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ आता (T20 World Cup 2026) आपल्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, १ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हायव्होल्टेज सामना (IND vs WI) रंगणार आहे. सुपर-८ फेरीतील हा अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी ‘उपांत्यपूर्व फेरी’ सारखाच असेल. उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

  • 27 Feb 2026 06:30 PM (IST)

    27 Feb 2026 06:30 PM (IST)

    Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

    PAk Vs AFG: दक्षिण आशियातील भू-राजकीय नकाशावर आता युद्धाचे ढग केवळ गडद झाले नाहीत, तर प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली आहे. अफगणिस्तानने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील पंतप्रधान कार्यालयाला निशाणा करून एअरस्ट्राईक केल्याचा दावा अफगणिस्तानने केला आहे.

  • 27 Feb 2026 06:18 PM (IST)

    27 Feb 2026 06:18 PM (IST)

    Vegetable price News : गृहिणींसाठी मोठा दिलासा; भाज्यांची किंमतीत मोठी घसरण ; मिरची टोमॅटोचे नवे दर काय ?

    कोल्हापूर : शेतकऱ्यांकडून फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे दर कमी झाले असून ग्राहकांमध्ये खरेदीची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपुरी भाजी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असून व्यवहारात वाढ झाली आहे. सध्या मेथी, पोकळा, चाकवत यांसारख्या पालेभाज्या दहा रुपयाला एक पेंडी या दराने बाजारात उपलब्ध आहेत. पालेभाज्यांचे दर स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी थेट बाजारात भाजी पाठवल्याने आवक वाढली असून त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. स्वस्त आणि ताजी भाजी मिळत असल्याने खरेदीत वाढ झाली आहे.

  • 27 Feb 2026 06:06 PM (IST)

    27 Feb 2026 06:06 PM (IST)

    Liver Cancer : क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन; समजून घ्या लिव्हर कॅन्सरचा धोका आणि त्याचे टप्पे…

    Liver Cancer Stages: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रिंकू सिंग यांचे वडील खानचंद सिंग यांचे शुक्रवारी 27 फेब्रुवारीला सकाळी ग्रेटर नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते स्टेज 4 यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. वृत्तसंस्था PTIच्या वृत्तानुसार, अलिकडच्या काळात त्यांची प्रकृतीत बराच बिघाड झाला होता.  त्यानंतर त्यांना 21 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आणि 27 फेब्रुवारीच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • 27 Feb 2026 05:50 PM (IST)

    27 Feb 2026 05:50 PM (IST)

    श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर

    श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षात सुमारे ६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्याच्या तुलनेत यंदा सुमारे ६ कोटींची घट नोंदवली गेली आहे. महसूली खर्चासाठी अंदाजे १३ कोटींची तरतूद असून भांडवली कामांसाठी ३९,८५,००,०२२ रूपये इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

  • 27 Feb 2026 05:32 PM (IST)

    27 Feb 2026 05:32 PM (IST)

    “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”; रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

    कोल्हापूर: (श. प्र.) गेल्या काही वर्षांत महानगरपालिका परिवहन विभागाच्या केएमटी उपक्रमास विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्यांचे मूळ शोधून केएमटी उपक्रमास उर्जितावस्था देण्यासाठी दीर्घकालीन सुधारणांवर भर देण्यास प्रयत्नशील असल्याचे नूतन परिवहन सदस्य रोहन अतिग्रे यांनी सांगितले.प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.प्रवाशांशी संवाद साधताना जेष्ठ नागरिकांनी ६५ वर्षावरील केएमटी प्रवाशांना, जेष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट करावे, अशी प्रमुख मागणी केली. यासह परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस उपलब्ध कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. केएमटी बस थांब्यावर प्रवाशांना पाणपोई, बैठक व्यवस्था अशा मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रवासाच्या दृष्टीने बसेस सुस्थितीत व साफसफाई केलेल्या असाव्यात. विशेष पासेस, मासिक पासेसमध्ये विशेष सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली.

  • 27 Feb 2026 05:07 PM (IST)

    27 Feb 2026 05:07 PM (IST)

    Arvind Kejriwal यांच्या अडचणी वाढणार?

    आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केले आहे. मात्र त्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सीबीआय हायकोर्टात आव्हान देणार आहे.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 27 Feb 2026 04:55 PM (IST)

    27 Feb 2026 04:55 PM (IST)

    रक्षक चौकातही 'नवले पूल' होणार? पुलाच्या कामावरून बारणेंनी इंजिनीअर्सना झापले!

    पिंपरी चिंचवडच्या रक्षक चौकातील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा आहे. कात्रजच्या नवले पुलावर जसे अपघात होतात, तसे इथं अपघात होऊन अनेक निष्पापांचे बळी जाऊ शकतात. अशा प्रसंगी आर्किटेक्टवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा संताप शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी व्यक्त केला. पिंपरी पालिकेचे अधिकारी, इंजिनीअर आणि आर्किटेक्टच्या उपस्थितीत बारणेंनी कानउघाडणी केली. पुलाचे तीव्र उतार अपघाताला आमंत्रण देणारे ठरणार आहेत, त्यामुळं पुलाची लांबी वाढवावी. बारणेंनी या त्रुटी दाखवत पालिकेच्या इंजिनीअर आणि आर्किटेक्टला धारेवर धरलं.

  • 27 Feb 2026 04:45 PM (IST)

    27 Feb 2026 04:45 PM (IST)

    पाणीटंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा

    डोंबिवलीतील पी एन टी कॉलनी परिसरातील नागरिकांचा पाणीटंचाईच्या विरोधात के डीएमसी मुख्यालयावर मोर्चा गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईचा करावा लागत असल्याने संतप्त नागरिकांनी मनपा कार्यालयावर मोर्चा वळवला होता.

  • 27 Feb 2026 04:40 PM (IST)

    27 Feb 2026 04:40 PM (IST)

    अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड!

    MINI कडून भारतात अनेक प्रीमियम कार्स ऑफर केल्या जातात. त्यापैकी Mini Cooper S Victory Edition साठी आजपासून म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून अधिकृतपणे प्री-बुकिंग सुरू करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक अधिकृत डीलरशिपमार्फत ही कार बुक करू शकतात.कंपनीकडून हे स्पेशल एडिशन मर्यादित संख्येत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ही कार केवळ निवडक ग्राहकांनाच मिळणार आहे. या एडिशनमध्ये खास JCW (John Cooper Works) पॅक देण्यात आला असून त्यामुळे कारचा स्पोर्टी लुक आणि परफॉर्मन्स अधिक आकर्षक झाला आहे.

  • 27 Feb 2026 04:25 PM (IST)

    27 Feb 2026 04:25 PM (IST)

    कोकणात पेटत्या होमातून धावणारा संकासुर

    कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील अडूर गावात ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक होलिकोत्सव दि.. २२ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उत्सवातील सर्वात आकर्षणाचा आणि थरारक भाग म्हणजे पेटत्या होमातून धावत भक्तांचा पाठलाग करणारा संकासुर. ही आगळीवेगळी परंपरा पाहाण्यासाठी दरवर्षी जिल्हा तसेच परजिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहातात.ग्रामदेवतेची पहिली होळी फाल्गुन पंचमीला प्रज्वलित होते. त्यादिवशी देवीच्या खेळ्यांची भोवनी चतुः सीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांत पार पडते. पेटत्या होमातून धावणारा संकासुर याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही तर संकासुर याला देव मानले जाते मात्र आपल्या याच देवाची प्रतिमा देवखेळ या वेबसिरींज मधून मलिन केल्यामुळे गावकरी यांच्यामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्यामुळे ही वेब सिरीज बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे .

  • 27 Feb 2026 04:20 PM (IST)

    27 Feb 2026 04:20 PM (IST)

    पनवेल–कर्जत रेल्वे कॉरिडॉर अंतिम टप्प्यात

    पनवेल–कर्जत रेल्वे कॉरिडॉर अंतिम टप्प्यात; पुढील वर्षी लोकल सेवा सुरू होणार. हा प्रकल्प नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल.

  • 27 Feb 2026 04:15 PM (IST)

    27 Feb 2026 04:15 PM (IST)

    नवी मुंबईत ड्रग्सवर मोठी कारवाई १३ कोटींचे अमली पदार्थ

    नवी मुंबईतील वाशी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई करत तब्बल १३ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 27 Feb 2026 04:13 PM (IST)

    27 Feb 2026 04:13 PM (IST)

    दहिसरमधील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

    दहिसरमधील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने परिसरात मोठी खळबळ, पोलिसांचा बंदोबस्त तैनात मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर केली. शिवाय सर्वत्र चितेचं वातावरण, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

  • 27 Feb 2026 04:00 PM (IST)

    27 Feb 2026 04:00 PM (IST)

    अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड!

    भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम आणि आघाडीच्या ऑटो कंपन्या आहेत. ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. देशात प्रीमियम सेगमेंटमधील कार्सना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. आता प्रीमियम कार म्हणून ओळखली जाणारी Mini Cooper S Victory Edition च्या प्री-बुकिंग सुरुवात झाली आहे. या खास एडिशनमध्ये कंपनीकडून काही विशेष डिझाइन आणि परफॉर्मन्स फीचर्स दिले जाणार आहेत. या कारमध्ये नेमकं काय खास आहे,त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • 27 Feb 2026 03:50 PM (IST)

    27 Feb 2026 03:50 PM (IST)

    PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला

    Afghan Air Force strikes Pakistan military bases 2026 : दक्षिण आशियातील भू-राजकीय नकाशावर आता युद्धाचे ढग केवळ गडद झाले नाहीत, तर प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने (Pakistan Afghanistan air war ) गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना अफगाण संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी अत्यंत आक्रमक आणि भीषण प्रत्युत्तर दिले आहे. अफगाण हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी थेट पाकिस्तानी हद्दीत शिरून लष्करी प्रतिष्ठाने, लष्करी वसाहती आणि तळांना लक्ष्य केले असून, या कारवाईने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत.

  • 27 Feb 2026 03:40 PM (IST)

    27 Feb 2026 03:40 PM (IST)

    Minister Dadaji Bhuse : कॉपीमुक्त अभियानाला तडा?

    राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. राज्यभरात परीक्षेचे वातावरण आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षा राबवण्यात येत आहेत. अशामध्ये एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्यभरातील एकूण १०७ परीक्षा केंद्रांना कुलूप लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. तसेच राज्यभरातील इतर सर्व परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान पारदर्शकता टिकून राहील व अजून नव्याने मजबूत होऊन आपल्या समोर येईल.

  • 27 Feb 2026 03:30 PM (IST)

    27 Feb 2026 03:30 PM (IST)

    Pak-Afg War: ‘असीम मुनीर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा…

    General Asim Munir America puppet social media : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan-Pakistan Conflict) सीमावादाने आता एका विनाशकारी युद्धाचे रूप धारण केले आहे. मात्र, या युद्धाची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला अफगाणिस्तानपेक्षा स्वतःच्याच देशातील जनतेकडून अधिक तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात असून, “मुनीर हे अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे आहेत,” अशा शब्दांत पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • 27 Feb 2026 03:25 PM (IST)

    27 Feb 2026 03:25 PM (IST)

    Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,

    जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम हलक्यात घेत असाल तर वेळीच सावध व्हा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार लवकरच देशातील संपूर्ण ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली बदलणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की भारतात लवकरच ‘ग्रेड-बेस्ड ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली’ लागू केली जाईल. याचा अर्थ वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतो. ही प्रणाली नेमकी काय आहे आणि ती कशी काम करेल? जाणून घ्या सविस्तर बातमी

  • 27 Feb 2026 03:15 PM (IST)

    27 Feb 2026 03:15 PM (IST)

    लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट

    भव्य आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारण्यापूर्वी घडलेला एक विलक्षण योगायोग अभिनेता रवि दुबे यांनी नुकताच उलगडला केला आहे. कास्टिंग निश्चित होण्याच्या साधारण वर्षभर आधी लखनौमध्ये शूटिंगदरम्यान अभिनेता लक्ष्मण मंदिरात गेले असल्याचे सांगितले आहे. आणि नेमकं त्यानंतर वर्षभराने त्यांच्याच वाट्याला लक्ष्मणाची भूमिका मिळाली.

    रवि दुबे हे भारतीय मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. शिवाय ‘ड्रीमियाटा एंटरटेनमेंट’ या बॅनरअंतर्गत त्यांनी यशस्वी निर्मात्याची भूमिकाही निभावली आहे. आता ते दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’मध्ये लक्ष्मण साकारताना दिसणार आहेत. या पौराणिक कथानकात रणबीर कपूर रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

  • 27 Feb 2026 03:06 PM (IST)

    27 Feb 2026 03:06 PM (IST)

    Sinhagad Fort वर 'त्या' व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

    पुणे: पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीची ओळख पटली असून ते बुधवारपासून बेपत्ता होते.दशरथ शंकर धोत्रे (मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृतकाचे नाव आहे. ते चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते.

  • 27 Feb 2026 02:50 PM (IST)

    27 Feb 2026 02:50 PM (IST)

    मुलांमधील ‘हे’ बदल म्हणजे जीनियस असण्याचे संकेत; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

    आपली मुलं जन्माला आली की आपण त्यांना घडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो. काही काही गोष्टी मुलं स्वतःच शिकतात. पालक या सगळ्याचं बारकाईने निरक्षण करतात. मुलांमध्ये होणारे लहान सहान सवयी आणि बदलांवरुन मुलं नेमकी कोणत्या दिशेला विकसीत होत आहेत याचा अंदाज बांधतात. आई-वडिलांसाठी आपलं मुलं ही जिनीयसच असतं पण ते किती जिनीयस आहे हे आता जाणून घेतलं जाउ शकतं.

  • 27 Feb 2026 02:45 PM (IST)

    27 Feb 2026 02:45 PM (IST)

    MCA CET: अर्जात दुरुस्तीची संधी! ‘या’ तारखांना घेण्यात येतील परीक्षा

    राज्यातील State Common Entrance Test Cell (सीईटी कक्ष) मार्फत घेतल्या जाणाऱ्या एमसीए आणि एम.एचएमसीटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम.एचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद झाली. यंदा एमसीए प्रवेश परीक्षेसाठी एकूण ५५ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, एम.एचएमसीटीसाठी केवळ ५५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.

  • 27 Feb 2026 02:40 PM (IST)

    27 Feb 2026 02:40 PM (IST)

    आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

    इंदापूर : उजनी जलाशयासाठी संपादीत करण्यात आलेल्या मात्र प्रत्यक्षात न वापरल्या गेलेल्या जमिनींवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवून त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान भवन येथे भेट घेतली आहे.

  • 27 Feb 2026 02:34 PM (IST)

    27 Feb 2026 02:34 PM (IST)

    ‘…पण तरी अजितपर्व कधी संपणारच नाही’; आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान

    मुंबई : माझ्यावर सत्तेतील काही लोकांनी टीका केली आहे. एफआयआर दाखल करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; मात्र, सध्या केवळ भाषणं आणि राजकीय टिप्पणीच केल्या जात आहेत. ‘नवीन पर्व सुरू झालं’ असं सांगितलं जात असलं, तरी अजितपर्व कधी संपणारच नाही. एफआयआर झाल्यानंतर तपास होणं अपरिहार्य आहे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

  • 27 Feb 2026 02:30 PM (IST)

    27 Feb 2026 02:30 PM (IST)

    6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा

    भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ त्यांच्या करोडो यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा एक धाकड रिचार्ज प्लॅन आहे, ज्याने सर्व टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 6.6TB डेटा मिळणार आहे. खरं तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत.

  • 27 Feb 2026 02:25 PM (IST)

    27 Feb 2026 02:25 PM (IST)

    260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव

    देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हवामान लोकांना आश्चर्यचकित करत आहे. राजधानी दिल्लीत उष्णता वाढत आहे, तर डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हिंदी महासागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हवामान परिस्थिती बदलत आहे. समुद्रावर निर्माण झालेले चक्रीवादळ ‘होरासिओ’ ताशी २६० किमी वेगाने पोहोचले आहे. हवामानशास्त्रज्ञ या वर्षीचे सर्वात धोकादायक वादळ म्हणत आहेत.

  • 27 Feb 2026 02:20 PM (IST)

    27 Feb 2026 02:20 PM (IST)

    चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या

    अमरावती: अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकन खाण्याच्या वादातून बारा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा अपघात असल्याचे भासवत खोटी तक्रार देखील देण्यात आली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना अमरावती येथील भातकुली येथे घडली.

  • 27 Feb 2026 02:15 PM (IST)

    27 Feb 2026 02:15 PM (IST)

    डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या बँक खात्यातून २.६० कोटींची उलाढाल; बँक कर्मचारी मैत्रिणीनेच दिला दगा

    डोंबिवलीतून सायबर आर्थिक फसवणूकीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एमएससीची विद्यार्थिनी निधी तिवारी हिच्या बँक खात्यातून २.६० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बँकेत काम करणाऱ्या आपल्याच एका मैत्रिणीने आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी तिच्या नावाने खाते सुरू केले आणि नंतर उत्तराखंडमधील निष्पाप लोकांची फसवणूक करण्यासाठी त्या खात्याचा वापर केला. गेल्या तीन महिन्यांपासून डोंबिवली पोलिसांना तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप निधी तिवारीने केला आहे.

  • 27 Feb 2026 02:06 PM (IST)

    27 Feb 2026 02:06 PM (IST)

    ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणाला न्यायालयाचा सुरुंग! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत

    जागतिक व्यापाराच्या पटलावर सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आक्रमकपणे लादलेल्या ‘जागतिक करा’ला (Global Tariff) तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून मोठा धक्का दिला आहे, तर दुसरीकडे या निकालानंतर काही दिवसांतच अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक (Howard Lutnick) अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, भारत आणि अमेरिका यांच्यातील भविष्यातील व्यापारी गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • 27 Feb 2026 02:00 PM (IST)

    27 Feb 2026 02:00 PM (IST)

    भविष्यात शेतीच देशाला तारणार ; मयांक गांधी यांचं वक्तव्य

    भविष्यात जमिनीच आपल्याला जगाचा महासत्ता बनवू शकते,त्यामुळे जमिनीवर काम करण्याची गरज असून जमिनीचे क्षेत्र कमी होत असताना आपले नेते जगातील तिसरी चौथी आर्थिक महासत्ता बनण्याची गोष्टी करीत आहे.पण ज्या ठिकाणी आपण आर्थिक स्तोत्र आहेत, त्या जमिनीमध्ये काम करण्याची गरज आहे. देशाचे पाण्याचे मंत्री सी आर पाटील यांना पाण्याची कमतरता किती कमी आहे याची कल्पना नाही आणि त्यामुळे जमीन आणि पाणी हे कमी पडत आहेत. हे ध्यानात न घेता मोठ्या घोषणा करणार असतील तर आर्थिक महासत्ता जे स्वप्नच राहील असे स्पष्ट मत ग्लोबल विकास ट्रस्टचे मयांक गांधी यांनी मांडले.गांधी हे नेरळ जवळील सगुणबाग येथे एसआरटी शेतकरी सन्मान सोहळ्यात उपस्थित होते.

  • 27 Feb 2026 01:55 PM (IST)

    27 Feb 2026 01:55 PM (IST)

    पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

    बदलापूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने पुन्हा आता मुलीच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

  • 27 Feb 2026 01:45 PM (IST)

    27 Feb 2026 01:45 PM (IST)

    मोर्चादरम्यान पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक संघर्ष

    जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस आणि निदर्शकांमध्ये जोरदार झटापट झाली. या घटनेत २५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अत्यंत विचित्र आणि गंभीर आरोप केले आहेत.

  • 27 Feb 2026 01:35 PM (IST)

    27 Feb 2026 01:35 PM (IST)

    कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना

    जुन्नर तालुक्यासह आणे-माळशेज पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमालीचे घसरले असून, शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ १० ते १३ इतका अल्प दर मिळत आहे. या पडत्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले असून, जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.

  • 27 Feb 2026 01:25 PM (IST)

    27 Feb 2026 01:25 PM (IST)

    ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीला हाताशी धरून इराणचे भव्य षड्यंत्र

    जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येचा कट किती खोलवर रचला गेला होता, याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. न्यू यॉर्कमध्ये सुरू असलेल्या एका ऐतिहासिक खटल्यात, ४७ वर्षीय पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याने इराणच्या इशाऱ्यावर ट्रम्प यांना मारण्याची सुपारी दिल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. एप्रिल २०२४ मध्ये न्यू यॉर्कमध्ये दाखल झालेला मर्चंट हा केवळ व्यापारी नसून तो एका आंतरराष्ट्रीय हत्येच्या कटाचा सूत्रधार असल्याचे अमेरिकन अभियोक्त्यांनी न्यायालयात सिद्ध केले आहे.

  • 27 Feb 2026 01:15 PM (IST)

    27 Feb 2026 01:15 PM (IST)

    मराठी भाषा दिनानिमित्त ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ ZEE5 वर रिलीज

    मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत जगभरात कौतुक मिळवलेला ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट आता ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. मराठी शाळांचा अभिमान, शालेय जीवनातील निरागसता आणि आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या मैत्रीचा हा भावनिक प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असा आहे. काही कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर त्या आपल्याला पुन्हा एका वेगळ्या काळात घेऊन जातात आणि आपल्या जुन्या, निरागस रूपाशी जोडतात. तसाच हा चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 27 Feb 2026 01:05 PM (IST)

    27 Feb 2026 01:05 PM (IST)

    WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली…

    आउटेज ट्रॅक करणाऱ्या Downdetector वेबसाईटवर विश्वास ठेवला तर, आतापर्यंत या समस्येसाठी 25 रिपोर्ट दाखल करण्यात आले आहेत. डेटानुसार, सुमारे 56 टक्के यूजर्सने वेबसाईटसंबंधित सामना करावा लागत असल्याची माहिती दिली आहे. तर 39 टक्के यूजर्सनी अ‍ॅप वापरताना अडचण येत असल्याचे सांगितलं आहे. 6 टक्के यूजर्सना मेसेज पाठवण्यात आणि रिसीव्ह करण्यात अडचण येत आहे. याबाबत अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे.

  • 27 Feb 2026 01:00 PM (IST)

    27 Feb 2026 01:00 PM (IST)

    चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी या गोष्टी करण्याचे टाळावे, अन्यथा बाळावर होऊ शकतो परिणाम

    धार्मिक दृष्टिकोन आणि शास्त्रांनुसार, ग्रहण हा सामान्य वेळेपेक्षा अधिक संवेदनशील आणि अशुभ परिणामांचा काळ मानला जातो. विशेषतः चंद्रग्रहण ही एक मोठी खगोलीय घटना मानली जाते आणि त्यांचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. प्रार्थना, आध्यात्मिक साधना आणि दक्षता यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली जाते. ग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे अशुभ मानली जातात, म्हणून गर्भवती महिलांनी या काळात चंद्रप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे टाळावे. अनावश्यक बाह्य क्रियाकलाप टाळणे देखील उचित आहे.

  • 27 Feb 2026 12:50 PM (IST)

    27 Feb 2026 12:50 PM (IST)

    २ लाख कोटींचे खत अनुदान थेट खात्यात? कृषी क्षेत्रात मोठ्या बदलांचे संकेत

    केंद्र सरकारने कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी कठोर आणि पारदर्शक सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांशी संबंधित कोणतीही तडजोड किंवा विलंब यापुढे सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांचा निधी रोखणाऱ्या कोणत्याही एजन्सीला किंवा राज्य सरकारला त्या रकमेवर १२% व्याज द्यावे लागेल, असा दम केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी भरला आहे. ते येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) तीन दिवसांच्या पुसा कृषी विज्ञान मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

  • 27 Feb 2026 12:40 PM (IST)

    27 Feb 2026 12:40 PM (IST)

    एक नकार दीपिका पादुकोणला पडला महाग! हातातून निसटला हॉलिवूड प्रोजेक्ट; अभिनेत्रीला मोठा झटका

    प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच्या अभिनयाने दीपिका पादुकोणने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. अशातच आता दीपिका पादुकोणबद्दल मोठी बातमी समोर आली आहे की, ती लवकरच ‘द व्हाईट लोटस सीझन 4’ मध्ये दिसणार आहे. पण ‘स्पिरिट’ आणि ‘कलकी 2898 एडी’ नंतर आता हा प्रोजेक्टही दीपिका पादुकोणच्या हातातून निसटला आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्रीच्या एका ‘नाही’मुळे तिला इतका मोठा प्रोजेक्ट गमवावा लागला आहे. ही माहिती मालिकेशी आणि अभिनेत्रीशी संबंधित एका सूत्राने दिली आहे.

  • 27 Feb 2026 12:30 PM (IST)

    27 Feb 2026 12:30 PM (IST)

    कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

    सॅमसंगने आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये नव्या स्मार्टफोन सिरीजसोबतच Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro देखील लाँच केले आहेत. दोन्ही मॉडेल्सचे डिझाईन, ऑडिओ आणि फीचर्स अपग्रेड आहेत. प्रो व्हेरिअंट बेस व्हेरिअंटपेक्षा जास्त फीचर्सने सुसज्ज आहे. या दोन्हीपैकी कोणते ईअरबड्स खरेदी करावे, यामध्ये तुम्ही गोंधळला आहात का? ही बातमी तुमचा गोंधळ दूर करू शकते. आता आम्ही तुम्हाला दोन्ही ईअरबड्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिव्हाईस खरेदी करू शकणार आहात.

  • 27 Feb 2026 12:25 PM (IST)

    27 Feb 2026 12:25 PM (IST)

    तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

    पाकिस्तानने अफगाणिस्तानातील टीटीपीच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादा याला लक्ष्य करण्यात आले होते याची पुष्टी झालेली नाही; दोन्ही देशांनी लष्करी सहभागाची कबुली दिली.

  • 27 Feb 2026 12:20 PM (IST)

    27 Feb 2026 12:20 PM (IST)

    पुणे बाजार समितीत नव्याने टेंडर झोल; उपसभापती सहीशिवाय निविदा नाहीच

    सलग तीन अधिवेशनात गैरकारभाराचे वाभाडे निघत असतानाही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कारभाराला लगाम लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता नव्याने काढलेल्या ई-निविदांमध्ये उपसभापती यांच्या स्वाक्षरीचा स्थळ पाहणी अहवाल अनिवार्य केल्याने टेंडर प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही अट ठराविक व मर्जीतल्या ठेकेदारांना लाभदायी ठरणार असल्याची जोरदार चर्चा बाजार वर्तुळात रंगली आहे.

  • 27 Feb 2026 12:15 PM (IST)

    27 Feb 2026 12:15 PM (IST)

    21 वर्षीय युट्यूबरने संपवलं जीवन; भावनिक सुसाईड नोट सापडला; मूव्ह ऑन व्हायला भीती वाटते…

    Hyderabadमध्ये 21 वर्षीय युट्यूबर बोनू कोमाली हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये आढळला. ब्रेकअपमुळे ती मानसिक तणावात असल्याची माहिती सुसाईड नोटमधून समोर आली. पोलिसांकडून फोन डेटा व सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

  • 27 Feb 2026 12:10 PM (IST)

    27 Feb 2026 12:10 PM (IST)

    Jack Dorsey यांच्या Block Inc.चा मोठा निर्णय! AI मुळे ४,००० जणांची नोकरी धोक्यात

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही नोकरदार वर्गासाठी मोठी समस्या बनताना दिसत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची फिनटेक कंपनी, ब्लॉक इंक., कंपनीने देखील एआयमुळे त्यांचे कर्मचारी अर्धे केले आहेत. पूर्वी स्क्वेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉक इंक. ने घोषणा केली आहे की ते सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. भविष्यात एआय यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल असे कंपनीचे मत आहे. जॅक डोर्सी यांच्या मते, भविष्यातील आव्हानांसाठी कंपनीला तयार करण्यासाठी आणि ती अधिक वेगवान बनवण्यासाठी हे पाऊल एक धोरणात्मक गुंतवणूक असल्याचे सांगितले.

  • 27 Feb 2026 12:05 PM (IST)

    27 Feb 2026 12:05 PM (IST)

    मद्य घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं

    आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तसेच सीबीआयकडे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते. इतर आरोपींनाही निर्दोष मुक्त करण्यात आले.

  • 27 Feb 2026 11:50 AM (IST)

    27 Feb 2026 11:50 AM (IST)

    Jack Dorsey यांच्या Block Inc.चा मोठा निर्णय! AI मुळे ४,००० जणांची नोकरी धोक्यात

     कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही नोकरदार वर्गासाठी मोठी समस्या बनताना दिसत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची फिनटेक कंपनी, ब्लॉक इंक., कंपनीने देखील एआयमुळे त्यांचे कर्मचारी अर्धे केले आहेत. पूर्वी स्क्वेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉक इंक. ने घोषणा केली आहे की ते सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. भविष्यात एआय यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल असे कंपनीचे मत आहे. जॅक डोर्सी यांच्या मते, भविष्यातील आव्हानांसाठी कंपनीला तयार करण्यासाठी आणि ती अधिक वेगवान बनवण्यासाठी हे पाऊल एक धोरणात्मक गुंतवणूक असल्याचे सांगितले.

  • 27 Feb 2026 11:40 AM (IST)

    27 Feb 2026 11:40 AM (IST)

    अफगाणिस्तानने पाकिस्तानचे ‘F-16’ लढाऊ विमान पाडले; ड्युरंड रेषेवर महायुद्धाचा भडका

    दक्षिण आशियातील रणांगण आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (तालिबान)(Afghanistan-Taliban Crisis) यांच्यातील संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित न राहता थेट हवाई युद्धापर्यंत पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या एका धक्कादायक वृत्तानुसार, अफगाण सुरक्षा दलांनी त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या एका एफ-१६ (F-16) लढाऊ विमानाला क्षेपणास्त्राने पाडले आहे. या विमानाचे जळते अवशेष पक्तिका प्रांतात पडल्याचे सांगण्यात येत असून, सोशल मीडियावर त्याचे थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.

Web Title: Maharashtra breaking news 27th february live updates maharashtra politics national international politics war cricket sports crime entertainment share market gold sliver rates live blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • maharashtra politics news today
  • national news

संबंधित बातम्या

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी
1

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग
2

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग

Iran-US War : ‘करार होवो वा न होवो, आम्हाला फरक पडत नाही’; इराणसोबतच्या चर्चेवर ट्रम्प यांचं मोठं विधान
3

Iran-US War : ‘करार होवो वा न होवो, आम्हाला फरक पडत नाही’; इराणसोबतच्या चर्चेवर ट्रम्प यांचं मोठं विधान

Artemis 2 Mission : नासाचे आर्टेमिस 2 मिशन यशस्वी; पृथ्वीवर सुखरूप पोहोचले अंतराळवीर
4

Artemis 2 Mission : नासाचे आर्टेमिस 2 मिशन यशस्वी; पृथ्वीवर सुखरूप पोहोचले अंतराळवीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.