Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics- दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशात वायूसेनेचे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 10:59 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Updates Today: दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:
  • 28 Feb 2026 10:59 AM (IST)

    28 Feb 2026 10:59 AM (IST)

    चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार Vijay आणि Rashmika

    रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघं सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्याचा विवाहसोहळा उदयपूर येथ थाटामाटात आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघे 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गीता गोविंदम या चित्रपटात रश्मिका आणि विजय यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

  • 28 Feb 2026 10:51 AM (IST)

    28 Feb 2026 10:51 AM (IST)

    Huawei ने उडवली सर्वांची झोप…

    टेक कंपनी Huawei ने स्मार्टफोन मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मॅड्रिडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नाऊ ईज युवर रन’ ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन जगासमोर सादर केला आहे. हा स्मार्टफोन Huawei Mate 80 Pro या नावाने लाँच करण्यात आला आहे. ग्लोबल व्हेरिअंट चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हेरिअंटपेक्षा थोडा वेगळा आहे. कारण हे डिव्हाईस HarmonyOS 6.0 ऐवजी EMUI 15.0 वर आधारित आहे.

  • 28 Feb 2026 10:43 AM (IST)

    28 Feb 2026 10:43 AM (IST)

    राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम

    राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असून, राज्यसभेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार, यावर अजूनही एकमत झालेले नाही. राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. शरद पवार मोठे नेते, पण आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी व्यक्त केली.

  • 28 Feb 2026 10:35 AM (IST)

    28 Feb 2026 10:35 AM (IST)

    IPL 2026 मध्ये Lucknow Super Giants दिसणार नव्या रंगात!

    खनऊ सुपर जायंट्सने शुक्रवारी, २६ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२६ हंगामापूर्वी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. एलएसजीने त्यांचा नेहमीचा निळा रंग सोडून सोनेरी रंगांसह लाल आणि खोल निळ्या पट्ट्यांसाठी सुरुवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे मालक शाश्वत गोएंका म्हणाले, “एलएसजीच्या चार वर्षांच्या प्रवासात, चाहते नेहमीच त्यांच्यासोबत राहिले आहेत, त्यांनी संघाशी आणि त्यांच्या ओळखीशी एक खोल भावनिक नाते निर्माण केले आहे.

  • 28 Feb 2026 10:27 AM (IST)

    28 Feb 2026 10:27 AM (IST)

    MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा

    शिखर बँक घोटाळा प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने शुक्रवारी स्वीकारला. त्यामुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह ७० हून अधिक जणांविरुद्ध दाखल या प्रकरणाला एकप्रकारे पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणी कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल फौजदारी प्रकरणांचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.

  • 28 Feb 2026 10:19 AM (IST)

    28 Feb 2026 10:19 AM (IST)

    सर C.V. Raman यांच्या ‘रमण इफेक्ट’चा विजय सोहळा

    आजचा दिवस भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे. २८ फेब्रुवारी म्हणजेच ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ (National Science Day). आजपासून बरोबर ९८ वर्षांपूर्वी, महान भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण (C.V. Raman) यांनी विज्ञानाच्या जगात एक असा चमत्कार केला, ज्याने संपूर्ण जगाला थक्क केले. ‘रमण इफेक्ट’ (Raman Effect) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शोधाने केवळ भारतीय विज्ञानाला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले नाही, तर भारताला विज्ञानातील पहिले नोबेल पारितोषिकही मिळवून दिले.

  • 28 Feb 2026 10:12 AM (IST)

    28 Feb 2026 10:12 AM (IST)

    आकिब नबीने रणजी ट्रॉफीमध्ये उडवली खळबळ

    जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने या रणजी ट्रॉफी हंगामात त्याच्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधले आहे. २९ वर्षीय गोलंदाजाने २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामात सातव्यांदा पाच बळी घेतले आहेत. तो एकाच हंगामात ६० बळी घेणारा तिसरा गोलंदाजही ठरला आहे. या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या दमदार कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी विजेता बनून इतिहास रचण्यास मदत होईल.

  • 28 Feb 2026 09:55 AM (IST)

    28 Feb 2026 09:55 AM (IST)

    Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश…

    फ्री फायर मॅक्समध्ये अनटेम्ड बीट फिस्ट नावाचा एक नवीन इव्हेंट सुरू झाला आहे. या धमाकेदार इव्हेंटमध्ये प्लेयर्सना प्रीमियम फिस्ट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे, ज्याचा वापर करून शत्रूवर विजय मिळवला जाऊ शकतो. यासोबतच प्लेयर्सना दोन जबरदस्त लूट क्रेट देखील मिळणार आहे, ज्याच्या मदतीने वेपन स्किन क्लेम केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, टीम बूस्टर आणि सुपर लेग पॉकेट सारखे आयटम्स देखील प्लेयर्सना गेममध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला गेममधील इव्हेंटमध्ये सहभागी होणे आवडत असेल तर तुम्ही या नव्या इव्हेंटबाबत जाणून घेऊ शकता.

  • 28 Feb 2026 09:45 AM (IST)

    28 Feb 2026 09:45 AM (IST)

    वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित

    बऱ्याच कायदेशीर लढाई आणि वादानंतर, “द केरळ स्टोरी” प्रदर्शित झाला आहे. जरी तो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता, परंतु कायदेशीर अडचणींमुळे सकाळी प्रदर्शित झाला नाही. दुपारी स्थगिती उठवण्यात आली, ज्यामुळे चित्रपट रात्रीपर्यंत थिएटरमध्ये पोहोचू शकला. काही ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता आणि काही ठिकाणी रात्री ८ वाजता शो सुरू झाले. पहिल्या दिवशी कमी तिकीट विक्रीमुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागू शकतो, कारण चित्रपटाच्या प्रदर्शनाची बातमी वेळेवर सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. “द केरळ स्टोरी २” हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या “द केरळ स्टोरी” चा सिक्वेल आहे. कमी बजेट असूनही, मागील चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता, सर्वांच्या नजरा दुसऱ्या भागावर आहेत.

  • 28 Feb 2026 09:25 AM (IST)

    28 Feb 2026 09:25 AM (IST)

    पत्नीचे संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की घातपात?

    सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.

  • 28 Feb 2026 09:15 AM (IST)

    28 Feb 2026 09:15 AM (IST)

    अजितदादांचा विमान अपघात की घातपात?

    अजित पवारांव्यतिरिक्त, विमानात इतर चार जण होते, ज्यात दोन क्रू मेंबर्स आणि अजित पवार यांचे दोन सहकारी होते. DGCA च्या मते, या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. बारामती विमान अपघाताच्या चौकशीदरम्यान डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या चार विमानांचे उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. बारामती अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिट आणि देखरेखीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली.

  • 28 Feb 2026 09:05 AM (IST)

    28 Feb 2026 09:05 AM (IST)

    पाकिस्तानी चाहत्यांवर आली श्रीलंकेकडे भीक मागण्याची वेळ!

    Pakistan cricket fans begged for victory from Sri Lanka : २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील गट २ चे समीकरण मनोरंजक बनले आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्सने मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. या गटातील अंतिम सुपर ८ सामना २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

  • 28 Feb 2026 08:50 AM (IST)

    28 Feb 2026 08:50 AM (IST)

    सोनं पुन्हा महागलं, चांदी 2.84 लाखांवर!

    28 फेब्रुवारी रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,158 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,811 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,119 रुपये आहे. भारतात 28 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,580 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,190 रुपये आहे. भारतात 28 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 284.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,84,900 रुपये आहे.

  • 28 Feb 2026 08:35 AM (IST)

    28 Feb 2026 08:35 AM (IST)

    ‘राज्यातील 50 लाख मतदार होणार कमी’; भाजप नेते किरीट सोमय्या

    सांगली : राज्यातील मतदार यादी शुद्धीकरण (एसआयआर) प्रक्रियेनंतर सुमारे 50 लाख मतदारांची नावे कमी होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जिल्ह्यातील ऊरुण ईश्वरपूर नगरपालिका व आटपाडी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • 28 Feb 2026 08:21 AM (IST)

    28 Feb 2026 08:21 AM (IST)

    दक्षिण अमेरिकेत वायूसेनेचे विमान कोसळले

    दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हिया देशात विमान कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. चलनी नोटांनी भरलेले बोलिव्हियन हवाई दलाचे विमान टेकऑफनंतर महामार्गावर कोसळले. विमानाने अनेक वाहनांनाही धडक दिल्याची माहिती दिली जात आहे.

Maharashtra to World Breaking News:

भारतात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता चांदीचे दर स्थिरावले आहेत. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,580 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,190 रुपये आहे.

Web Title: Maharashtra breaking news 28th february live updates maharashtra politics national international politics war cricket sports crime entertainment share market gold sliver rates live blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • maharashtra politics news today
  • national news

संबंधित बातम्या

Trump Cuba Deal: हवानामध्ये आता फडकणार अमेरिकन झेंडा? डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘Friendly Takeover’ बद्दल केले आश्चर्यकारक विधान
1

Trump Cuba Deal: हवानामध्ये आता फडकणार अमेरिकन झेंडा? डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘Friendly Takeover’ बद्दल केले आश्चर्यकारक विधान

भारत-इस्रायल संबंध आणखी सुधारणार; पाकिस्तान आणि तुर्कीची वाढली चिंता
2

भारत-इस्रायल संबंध आणखी सुधारणार; पाकिस्तान आणि तुर्कीची वाढली चिंता

USIndiaTrade: ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणाला न्यायालयाचा सुरुंग! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत; पियुष गोयल यांच्यासोबत खलबतं
3

USIndiaTrade: ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ धोरणाला न्यायालयाचा सुरुंग! अमेरिकन वाणिज्य सचिव तातडीने दिल्लीत; पियुष गोयल यांच्यासोबत खलबतं

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार
4

Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.