Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात”; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून संजय नहार यांचे प्रतिपादन

98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan: त्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात. सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं, असे प्रदीप पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 02:29 PM
"... हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात"; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्य संयोजक संजय नहार यांचे प्रतिपादन

"... हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात"; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्य संयोजक संजय नहार यांचे प्रतिपादन

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: “प्रामाणिक माणसे इतिहास घडवतात व अशा माणसांचा इतिहास लिहल्यास त्यांच्या कार्याला न्याय मिळतो. हीच माणसे व्यवस्था बदलू शकतात, आणि म्हणूनच व्यवस्था बदलासाठी आपल्या चांगुलपणाची जाणीव होणे महत्वाचे असते.” असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि मुख्य संयोजक संजय नहार यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छत्रपती संभाजी महाराज खुल्या अभिव्यक्ती मंचावर यावेळी ते बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या अभिव्यक्ती मंचाचे संयोजक डॉ. शरद गोरे, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, तुकाराम महाराजांचे वंशज रामदास मोरे, कवी युवराज नळे, विक्रम मालन आप्पासो शिंदे, कवी अमोल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

संजय नहार म्हणाले, “उपेक्षित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी विचारमंच दिलाच पाहिजे. ही साहित्याची प्रचलित व्यवस्था बदलायची असेल तर सामान्य माणसाची लढाई ही सन्मानाची आहे. साहित्यिकांचे विचार आणि कृती सारखी असेल तरच त्याचे समाज व्यवस्थेमध्ये योगदान लाभू शकते. शरद गोरे हे संत नामदेवांच्या मार्गाने विद्रोह करणारे असून साहित्यिकांसाठी त्यांनी हक्काच विचारपीठ निर्माण केले आहे.

“राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई…”; साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर

बंडखोरी ही आपली ताकद आहे. साहित्यिक बंडखोरच असले पाहिजेत. ” प्रदीप पाटील म्हणाले,” सत्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात. सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं. साहित्यातून समाज उपयोगी कार्य करत रहा. आपल्या मराठीचा डंका आता साहित्यिकच अटकेपार नेऊ शकतो.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रमेश रेडेकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा महासंघाचे गणेश दिवेकर यांनी केले. आभार विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी मानले.

” ज्ञानोबांचा जागर या संमेलनात झाला ही अभिमानाची बाब आहे. मात्र संत तुकाराम महाराजांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान हे सर्वोच्च असून देखील त्यांची या संमेलनात प्रतिमा किंवा प्रतिकृती कुठेच लावली नाही. त्याचबरोबर कोणत्याच सभामंडपाला त्यांचे नाव देखील दिले नाही. याची खंत आहे.”
– रामदास मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज.

“हे साहित्य संमेलन अभूतपूर्ण होण्यामागे संजय नहार यांचे योगदान आहे. संमेलन कसे असावे याचा वस्तुपाठ नहार यांनी देशाला दाखवून दिला. साहित्य संमेलनाचा हेतू हा माणसांना जोडणारा असावा. साहित्य क्षेत्रातील विपरीत गोष्टी बाजूला काढून साहित्य क्षेत्रात शुद्धीकरण करण्याचं काम संजय नहार यांनी केले.”
– डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद.

Web Title: 98 th akhil bhartiy marathi sahitya samelan chief convenor sanjay nahar told honest people make history delhi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • akhil bhartiya marathi sahitya sammelan
  • Delhi news
  • New Delhi

संबंधित बातम्या

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन,  तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर
1

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

एकही कमी पाणीपुरी सहन केली जाणार नाही..वडोदऱ्याच्या रस्त्यावर तरुणी बनली आंदोलक
2

एकही कमी पाणीपुरी सहन केली जाणार नाही..वडोदऱ्याच्या रस्त्यावर तरुणी बनली आंदोलक

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार
3

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कोमोर्तब; ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा
4

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कोमोर्तब; ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.