Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद! वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षांना व जनतेला पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 21, 2026 | 05:40 PM
वंचित बहुजन आघाडीचा 'या' दिवशी महाराष्ट्र बंद'ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन (Photo Credit- X)

वंचित बहुजन आघाडीचा 'या' दिवशी महाराष्ट्र बंद'ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद!
  • वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक
  • प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद आता महाराष्ट्रात तीव्रतेने उमटू लागले आहेत. या दडपशाहीचा आणि अमानुष पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) येत्या २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही घोषणा करत राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांवरील दडपशाही खपवून घेणार नाही – प्रकाश आंबेडकर

दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “संसद परिसरात शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. सरकारची ही दडपशाही अत्यंत संतापजनक आहे. या अन्यायाविरुद्ध आणि पीडित विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी राज्यव्यापी बंदचे आयोजन केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आग्रहाची विनंती करतो की, त्यांनी या अत्याचाराविरोधात एकत्र यावे आणि २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा.”

काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मी सर्व… https://t.co/5MHwdJGn14 — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 21, 2026

“जनता सत्तेवर बसवू शकते, तर खालीही उतरवू शकते”; दिल्लीतील लाठीचार्जवर अमित ठाकरेंचा संताप, फडणवीसांवरही साधला निशाणा

जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा

दरम्यान,  संजय राऊत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.” शिवाजी पार्कवरील सभा, तसेच पुणे आणि नागपूरमधील युवकांचा प्रतिसाद पाहता देशभरात या आंदोलनाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या वेळ पडली तर आम्हीही आंदोलनात बसू’

सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले, “जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली तर आम्हीही इथे येऊन बसू. आम्ही जेलला किंवा गोळ्यांना घाबरत नाही. देशासाठी प्राण देणाऱ्यांमध्ये आम्हीही आहोत.” दिल्लीतील पोलिस कारवाईवर टीका करत त्यांनी ती घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला.

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन

Web Title: Prakash ambedkar calls maharashtra bandh on 23 july over delhi student protest lathicharge marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • central goverment
  • CJP Protest
  • Delhi Police
  • Maharashtra Bandh
  • New Delhi
  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Youth Employment Crisis: देशात तरुणांची संख्या वाढली पण नोकरी का मिळेना? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!
1

Youth Employment Crisis: देशात तरुणांची संख्या वाढली पण नोकरी का मिळेना? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड
2

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!
3

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक
4

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.