Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना करा; केतन हत्याकांडानंतर भाजप खासदाराची मोठी मागणी

भाजपचे राज्यसभा खासदार आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनी देशात 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन करण्याची जोरदार मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 01:26 PM
राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना करा; केतन हत्याकांडानंतर भाजप खासदाराची मोठी मागणी

राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना करा; केतन हत्याकांडानंतर भाजप खासदाराची मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांडानंतर देशभरात पुरुषांच्या हक्कांबाबत आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनी देशात ‘राष्ट्रीय पुरुष आयोग’ स्थापन करण्याची जोरदार मागणी केली आहे. केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

यापूर्वीच मुद्दा उपस्थित केला

शनिवारी खासदार अशोक मित्तल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर डिसेंबर २०२५ मधील राज्यसभा कामकाजाचा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी ‘नॅशनल कमिशन फॉर मेन बिल’ या खासगी सदस्य विधेयकाद्वारे राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केल्याची आठवण करून दिली. अशोक कुमार मित्तल हे पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले होते.

मित्तल यांनी काय म्हटले आहे?

मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. केतन आणि त्यांच्या कुटुंबाला निष्पक्ष, सर्वंकष आणि कोणताही भेदभाव न करता तपास करावा, तसेच न्याय मिळावा. प्रत्येक पीडिताला समान कायदेशीर संरक्षण, मदत आणि न्याय मिळायला हवा. केतन प्रकरणातून पुरुषही अत्याचाराचे बळी ठरू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी संस्थात्मक मदत, कायदेशीर संरक्षण आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे स्वतंत्र व्यासपीठ असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

खासगी विधेयक म्हणजे काय?

संसदेत सरकारव्यतिरिक्त इतर खासदारांनी मांडलेल्या विधेयकाला खासगी सदस्य विधेयक म्हटले जाते. अशी विधेयके कायद्यात रूपांतरित होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत केवळ १४ खासगी सदस्य विधेयके कायदा बनली असून, १९७० नंतर एकही खासगी सदस्य विधेयक संसदेत मंजूर झालेले नाही.

हे सुद्धा वाचा : ‘मानसशास्त्रीय’ पद्धतीने केतनच्या खुनाचा उलगडा, पासपोर्ट अन् हुडीने दाखवली दिशा; पोलिसी खाक्याचा वापर नाही

Web Title: A bjp mp has demanded the establishment of a national commission for men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Ketan Agrawal Murder Case
  • Murder Case
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

अनिस बाबा बनून आसिफ देत होता गुंगारा; मुंबईतील रेड लाईट परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

अनिस बाबा बनून आसिफ देत होता गुंगारा; मुंबईतील रेड लाईट परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
2

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

Ketan Agrawal Murder Case : ‘सियाने मिडल फिंगर दाखवली नव्हती’; केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांचे स्पष्टीकरण
3

Ketan Agrawal Murder Case : ‘सियाने मिडल फिंगर दाखवली नव्हती’; केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांचे स्पष्टीकरण

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी
4

Beed Crime : पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.