Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 13, 2025 | 07:20 AM
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तापमानात घसरण होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यात उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामांना तोंड देत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पारा गोठणबिंदूच्या खाली गेला आहे.

ईशान्येकडील राज्यात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डिसेंबरमधील थंडी देशाच्या अनेक भागात दिसून येत आहे. उत्तर भारतात सध्या थंडी, प्रदूषण, धुके पाहिला मिळत आहे. कमी तापमान, मंद वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता कमी वातावरणात प्रदूषकांना अडकवते, ज्यामुळे धुके आणि धूर एकत्रितपणे दाट धुके तयार होताना दिसत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या अनेक भागात हा थर जाड होत आहे, ज्यामुळे दृश्यमानता कमी होते आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे.

दरम्यान, सकाळच्या वेळी वायू प्रदूषक सर्वाधिक सक्रिय असतात, ज्यामुळे बाहेर जाणे अधिक धोकादायक बनते. त्यामुळे या राज्यातील लोकांना बाहेर जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठी घट दिसून आली आहे. ईशान्य भारतात जेट स्ट्रीम सक्रिय आहे आणि १३ डिसेंबरपासून हवामान बदलेल.

उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुके

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंडमध्ये थंड हवामान आहे आणि आजही काही प्रमाणात आराम मिळण्याची चिन्हे नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. ज्यामुळे थंडी आणखी तीव्र जाणवणार आहे. डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार, रविवारी (दि.१४) उंचावरील भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यामुळे तापमान आणखी खाली येऊ शकते.

पुण्यात काश्मीरसारखी थंडी

महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम असून पुणे शहरात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.

हेदेखील वाचा : Weather Update : उत्तराखंड, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा वाढला कडाका; डोंगराळ भागात बर्फवृष्टी

Web Title: A cold wave is increasing across several states including himachal pradesh and jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • Climate Change
  • Weather Update
  • Winter Season

संबंधित बातम्या

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
1

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
2

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी
3

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता
4

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.