हैदराबाद : स्मार्टफोन (Smart Phone) हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. लोकांशी कनेक्ट होण्यापासून ते आम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी ऑर्डर (Order) करण्यापर्यंत आपण फक्त आपल्या फोन वापरतो. पण, कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर केल्यास त्याच्या आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. हैदराबादमध्ये (Hyderabad) असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हैदराबाद येथील एका महिलेचे डोळे मोबाईल पाहिल्याने खराब झाल्याचे उघडकीस आले आहे. 30 वर्षीय या महिलेला त्यामुळे खूपच समस्यांना सामोरे जावे लागले. या महिलेची डोळे अधू झाल्याने तिला सलग 18 महिने उपचार घ्यावे लागले, त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोशल मिडीयावर शेअर केलेली माहिती तुमची झोप उडवू शकते.
दृष्टी झाली होती अधू
हैदराबादच्या अपोलो रूग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी म्हटले आहे की, तीस वर्षीय मंजू यांच दृष्टी अधू झाली होती. ही समस्या तिला दीड वर्षे होती. मंजूला तिच्या डोळ्यांसमोर फ्लोटर्स ( ताऱ्यांसारखे चमकते ) लाईट्स, चमकते फ्लॅश, डार्क झीग झॅग लाईन्स दिसत होत्या. कधी कधी तर कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. कधी कधी तर काही सेंकद त्यांना काहीच दिसत नव्हते. रात्री वॉश रूमला जायचे असायचे तेव्हा तिला अशा प्रकारे त्रास व्हायचा. जेव्हा तिने डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखविले तर तिचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते. परंतु त्रास तर सुरूच होता. मग तिनं न्यूरोलॉजिस्ट गाठला.
अंधारात रात्री मोबाईल पहायची सवय
डॉक्टरांनी तिची हिस्ट्रूी चेक केली तर तिनं दिव्यांग मुलासाठी स्वत:ची नोकरी सोडल्यानंतर तिला ही समस्या सुरू झाल्याचं उघडकीस आलं. तिला आता भरपूर मोकळा वेळ मिळाला होता. लाईट बंद करून रात्रीचा मोबाईल पहायची सवय तिला लागली. अनेक तास स्क्रीन स्क्रोल करीत रहायची तिला सवयच लागली. ती फोनचा वापर मनोरंजनासाठी करायची. यात कधी कधी सलग दोन तास रात्रीचे लाईट बंद करून मोबाईल पहाण्याची तिला सवय लागली. डॉक्टरांनी सांगितले की तिला स्मार्ट फोन व्हीजन सिंड्रोमची बाधा झाल्याचे उघडकीस आले. कंप्यूटर, स्मार्टफोन किंवा टॅबलेट खूप वेळ पाहिल्यानंतर डोळ्यांशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
मोबाईलपासून दूर होताच बरी झाली मंजू
डॉ.सूधीर यांनी सांगितले की, मंजूला कोणतेही औषध न देता केवळ फोनचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला. केवळ अत्यंत गरज असेल तेव्हाच तिला मोबाईल पहावा असे बजावले. एक महिन्याच्या या प्रयोगानंतर मंजू बरी झाली. 18 महिन्यांपासून त्यांची कमी झालेली दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. आता तिची आयसाईट पूर्ववत झाली आहे. आता तिच्या डोळ्यापुढे कोणतीही चमकता उजेड किंवा इतर विभ्रम दिसत नाहीत. रात्रीच्यावेळी वॉश रुमला जाताना तिच्या डोळ्यांसमोर येणारी अंधारी दूर झाली.
तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काय सल्ला ?
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की कोणताही डीजिटल डिव्हाईस जास्त वेळ वापरू नका, त्यामुळे डोळ्यांच्यावर गंभीर परीणाम होऊ शकतो. दर २० – २० मिनिटांचा ब्रेक घेणे गरजेचे आहे. स्क्रीनवर काम करताना स्क्रीन पासून डोळे दूर करायला हवे, स्क्रीनवर काम करताना सलग जादा वेळ न बसता अधूनमधून ब्रेक घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.