पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल (Photo Credit- X)
आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदींनी एक बोचरी शायरी ऐकवली:
“तुम कितना दुनिया को धोखा दोगे, आईना देख लिया तो अपनी सच्चाई कहां छुपाओगे”
ज्यांची सरकारे ‘दारू’ घोटाळ्यात बुडाली आहेत, ते आज आम्हाला नीतिमत्ता शिकवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी ‘आप’वर बोचरी टीका केली.
#WATCH पीएम मोदी ने कहा, “एक सांसद बहुत सारी बातें कह रहे थे। उनकी पूरी सरकार शराब में डूबी हुई है। उनका ‘शीशमहल’ हर घर में नफरत की वजह बन गया… चाहे कांग्रेस हो, टीएमसी हो, डीएमके हो, लेफ्ट हो – ये दशकों तक केंद्र में सत्ता में थे। वे राज्यों में भी सत्ता में थे। लेकिन उनके समय… pic.twitter.com/90PoLywpUO — ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2026
“विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला
आपल्या भाषणात मोदींनी विरोधकांच्या सत्ताकाळातील कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “काँग्रेस, टीएमसी, डीएमके किंवा लेफ्ट असो, या सर्वांनी दशकांपासून केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता उपभोगली आहे. पण यांची ओळख फक्त ‘स्वतःचे खिसे भरणारे’ अशी निर्माण झाली आहे.” सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवणे हे या पक्षांचे कधीच प्राधान्य नव्हते. “आज जेव्हा ‘डील’ची चर्चा होते, तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो. मात्र, पूर्वी जेव्हा ‘डील’ व्हायची, तेव्हा बोफोर्ससारखे घोटाळे समोर यायचे.”
पंतप्रधानांनी भारताच्या वाढत्या आर्थिक शक्तीचा आणि नुकत्याच झालेल्या ‘ट्रेड डील’चा उल्लेख केला. “आज संपूर्ण जग भारताच्या व्यापार करारांचे कौतुक करत आहे. जगातील अस्थिरता कमी झाली असून भारतीय तरुणांसाठी जागतिक बाजारपेठ खुली होत आहे.” भारत अनेक देशांशी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन व्यापार करार करत असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आणि विरोधक मात्र या प्रगतीवर टीका करण्यात धन्यता मानत असल्याचे सांगितले.
हे लक्षात घेतले पाहिजे की संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी लोकसभेत त्यांचे भाषण देऊ शकले नाहीत. त्यांना सायंकाळी ५ वाजता आभार प्रस्तावाला उत्तर द्यायचे होते, परंतु विरोधी महिला खासदारांच्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.
गुरुवारी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, काल सभागृहात पंतप्रधान मोदींसोबत काही अनपेक्षित घटना घडली असू शकते, ज्यामुळे त्यांचे भाषण शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आले. पंतप्रधान मोदी त्यांच्या विनंतीवरून सभागृहात आले नाहीत. आज, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले.






