पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह (फोटो- संसद टीव्ही)
विकासामुळे आपला देश विकसित झाला
देशात वेगाने विकासकामे सुरू
विकासामुळे आपली अर्थव्यवस्था झाली मजबूत
BJP Vs Congress Budget Session Live: सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात गेले काही दिवस सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कॉँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर उत्तर दिले आहे. यावेळी सभागृहात पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशातील युवक भारताच्या सामर्थ्याला कसे पुढे नेत आहेत, ते आपण पाहतो. राष्ट्रपती यांनी भारताच्या उज्वल भविष्यबाबत भाष्य केले आहे. आता आपल्याला मागे वळून पहायचे नाही आणि थांबायचे नाहीये. आता लक्ष्य पूर्ण करूनच आपल्याला थांबायचे आहे. भारताचा वेगाने विकास होत आहे.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देखील टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते हे वयस्कर व्यक्ती आहेत. ते बसूनही घोषणा देऊ शकतात. त्यांना उभे राहण्याची गरज नाही. जग भारताचे महत्व समजत आहे.आपल्या देशात सर्वात मोठे युवा टॅलेंट आहे. भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.”
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/MelS1S0NF2 — Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
“भारत जगासाठी एक मजबूत असा पर्याय बनत आहे. मला विश्वास आहे की, भारताचा दूसरा तिमाही विकास देखील तितकाच चांगला असेल. भारताच्या नाशिबासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, याचा मला आनंद आहे. आज तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रीडा, अंतराळ, विज्ञान यामध्ये भारताचा आत्मविश्वास वाढला आहे,” असे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले.
“पंतप्रधान सत्याला सामोरे जाण्यास घाबरले” – राहुल गांधी
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत. त्यांनी म्हटले, “मी दुपारीच सांगितले होते की पंतप्रधान संसदेत येणार नाहीत. ते घाबरलेले आहेत आणि त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही.”
लोकसभेत सायंकाळी ५ वाजता कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती संध्या राय यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने सुरूच राहिली. या अभूतपूर्व गोंधळामुळे पंतप्रधान आपले निवेदन देऊ शकले नाहीत आणि त्यांचे भाषण पुढे ढकलण्यात आले.






