
CJP Protest साठी वाईट बातमी! आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांची तब्येत बिघडली,कोणता आजार झाला? जंतरमंतरवरील आंदोलनाच काय होणार?
व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती. आता माझे रक्त तपासणीचे अहवाल आले असून डॉक्टरांनी मला टायफॉईड झाल्याचे सांगितले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. दररोज सकाळ-संध्याकाळ आयव्ही (IV) उपचार दिले जात आहेत.” तसेच, देशभरात शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले. आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांना अधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Have been diagnosed with typhoid, but the fight will go on until Dharmendra Pradhan resigns! pic.twitter.com/8iHSZdF6K7 — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 25, 2026
देशातील विविध राज्यांत आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे दिपके यांनी विशेष आभार व्यक्त केले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेला लढा अधिक प्रभावी ठरत असल्याचे सांगत, लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
अभिजीत दिपके यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक समर्थकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या असून आंदोलनाला पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर काहींनी त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत उपचारांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृती बिघडलेली असतानाही उपचार सुरू ठेवत आंदोलनावरील भूमिका कायम असल्याचा संदेश दिपके यांनी या व्हिडिओद्वारे आपल्या समर्थकांना दिला आहे.
CJP Warning To Govt: शनिवार दुपारी ३:३० वाजेपर्यंत…; CJPचा सरकारलाचा शेवटचा ‘अल्टिमेटम’