Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP ची ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेची घोषणा; ‘शिक्षण महाग, बेरोजगारी सर्वात मोठा प्रश्न’; अभिजीत दिपके यांची केंद्र सरकारवर टीका

जंतरमंतर आंदोलनानंतर चर्चेत आलेले CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण आणि बेरोजगारी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न असल्याचा दावा केला. 'क्या बोलती पब्लिक' या अभियानाद्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 09:00 PM
CJP Delhi March, Cockroach Janata Party, Saurav Das CJP,

CJP Delhi March, Cockroach Janata Party, Saurav Das CJP,

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबरपासून CJPचे ‘क्या बोलती पब्लिक’ अभियान सुरू होणार.
  • शिक्षण आणि बेरोजगारीला देशातील प्रमुख प्रश्न असल्याचा दावा.
  • संविधान, लोकशाही आणि जनसंवादावर भर देत पक्षाची भूमिका स्पष्ट
 

जंतरमंतर आंदोलनानंतर चर्चेत आलेले कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य करत पक्षाच्या आगामी वाटचालीची रूपरेषा जाहीर केली आहे. संभाजीनगर येथे दोन दिवसांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ नावाने राष्ट्रव्यापी जनसंवाद अभियान सुरू करण्याची घोषणा केली.

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, अनेकांना CJP म्हणजे नेमका कोणता पक्ष, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या संविधानिक मूल्यांवर आणि लोकशाहीच्या विचारांवर पक्षाची वाटचाल असेल. पक्ष धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत असून संविधान हेच आपले मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेअंतर्गत देशभर दौरे करून नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि चिंता समजून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची टीका करत त्यांनी, संसदेतही या विषयांवर अपेक्षित गांभीर्याने चर्चा होत नसल्याचा दावा केला.

शिंदे गटाला मोठा झटका? ‘…उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निवडले’, कपिल सिब्बल यांचा दावा; सुप्रीम कोर्टात आतापर्यंत काय घडलं?

शिक्षण व्यवस्थेबाबत बोलताना दिपके म्हणाले की, आज उच्च शिक्षण घेणे अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते आणि त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर आर्थिक ओझे वाढते. शिक्षण व्यवस्था अधिक परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी व्यापक बदलांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेरोजगारी हा देशासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असल्याचे सांगताना त्यांनी युवकांच्या रोजगाराच्या संधींबाबत चिंता व्यक्त केली. “प्रत्येक तरुणाचे स्वप्न डिलिव्हरी बॉय होणे नसते,” असे म्हणत त्यांनी गुणवत्तापूर्ण रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. जंतरमंतर आंदोलनात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर रोजगाराच्या प्रश्नाने त्रस्त असलेले अनेक युवक सहभागी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

‘आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही’; ‘जेन झी’बाबत मोहन भागवतांचे मोठे विधान, शिक्षण व्यवस्थेवरही व्यक्त केली चिंता

याशिवाय, माध्यमे आणि न्यायव्यवस्थेबाबतही त्यांनी आपली मते व्यक्त केली. न्याय मिळण्यात होणारा विलंब, लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास आणि समाजातील वाढत्या असंतोषाचा उल्लेख करत त्यांनी लोकांशी थेट संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाची राजकीय भूमिका असल्याचे स्पष्ट केले असून, शिक्षण, रोजगार आणि संविधानिक मूल्ये हे आगामी काळात CJPच्या अभियानाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Abhijit dipke cjp kya bolti public campaign education unemployment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • CJP Protest

संबंधित बातम्या

Satara CJP Protest:साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी
1

Satara CJP Protest:साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती
2

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.