TVK Vijay Breaking: करूर घटनेवर विजयची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मी त्यांना सोडून कसे..."
तामिळनाडूमध्ये रॅलीत चेंगराचेंगरी प्रकरणात 40 लोकांचा मृत्यू
अभिनेता विजयने दिली पहिली प्रतिक्रिया
टीव्हीके पक्षाच्या अडचणी वाढणार
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये करूर येथे अभिनेता आणि नेता विजयच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हायकोर्टात टीव्हीकेच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर अभिनेता आणि नेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे.
थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील करूर येथे थलपति अभिनेता विजयच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. या रॅलीत लाखो लोकांची गर्दी जमा झाली होती. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभे राहून रॅलीत सामील झाला होता. त्या ठिकाणी तो लोकांना प्रतिसाद देत होते. रस्त्यावरून रॅली जात असताना अभिनेता भाषण देखील करताना दिसला.
Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?
त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा अशी घोषणा लोकांना केली. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर गर्दीमध्ये एकाच गोंधळ उडाला.
अभिनेता विजय काय म्हणाला?
करूर येथील घटनेबाबत बोलताना विजय म्हणाला, “करूरमध्ये घडलेल्या घटनेने मला मोठा धक्का बसला आहे. आम्ही पोलिसांकडून सुरक्षित ठिकाणांची परवानगी मागितली होती. तरी ही दुर्दैवी घटना घडली आहे. कार्यक्रमात सर्वांच्या सुरक्षितेतसाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आल्या होत्या. बाधित लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकरच बरे होण्याची अपेक्षा आहे. या घटनेतील सत्य लवकरच समोर येईल. ”
pic.twitter.com/FipkqoLlmB — TVK Vijay (@TVKVijayHQ) September 30, 2025
पुढे बोलताना विजय म्हणाला, “मी पण माणूस आहे. या घटनेत इतके सारे लोक प्रभावित झाले आहेत, तर मी त्यांना सोडून कसे येऊ शकतो? आम्ही पाच जिल्ह्यात प्रचार केला. मग करूरमध्ये कसे झाले? लोक सत्य जाणतात.”
मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात आज त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने आज होणारी सुनावणी रद्द केली आहे.