विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी
40 लोकांचा झाला होता मृत्यू
मद्रास हायकोर्टात याचिका दाखल
TVK Stampede: अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. विजय थलापती याची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान टीव्हीके पक्षाला रॅली किंवा कोणताही कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देऊ नये अशी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आता मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात आज त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने आज होणारी सुनावणी रद्द केली आहे.
मद्रास हायकोर्टात आज याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. तामिळनाडू डिजीपी यांनी टिव्हिके पक्षाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये असे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. करूर येथे चेंगराचेंगरी झालेल्या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
मद्रास हायकोर्टाने हे प्रकरण पुढील आठडवभर स्थगित केले आहे. चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांनी टीव्हीके पक्षावर आरोप केले आहेत. नियोजनामध्ये ढिसाळपणा व् हलगर्जीपणा झाल्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात आले आहेत.
थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील करूर येथे थलपति अभिनेता विजयच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. या रॅलीत लाखो लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभे राहून रॅलीत सामील झाले होते. आणि लोकांना प्रतिसाद देत होते. रस्त्यावरून रॅली जात असताना अभिनेता भाषण देखील करताना दिसला. त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा अशी घोषणा लोकांना केली. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर गर्दीमध्ये एकाच गोंधळ उडाला. गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.