न्यायालयाने म्हटले आहे की पक्षाचे नेते विजय घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेले आणि पक्षाने त्याबद्दल दुःखही व्यक्त केले नाही, यातून त्यांची मानसिकता दिसून येते.
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.
यामध्ये आयोजकांनी 30000 लोकांसाठी परवानगी घेतली होती. मात्र, रॅलीमध्ये 60000 हून अधिक गर्दी जमली होती. शिवाय, विजय स्वतः त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा रॅलीत पोहोचले.