Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनचे डबे पेटविले; रस्ते वाहतुकीतही केली आडकाठी

बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन (Movement At The Railway Station) करण्यात आलं असून या ठिकाणी दगडफेकही (Stone Pelting) करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 16, 2022 | 03:12 PM
Agitation against Modi governments Agneepath scheme in Bihar Students set fire to train coaches Road traffic was also obstructed

Agitation against Modi governments Agneepath scheme in Bihar Students set fire to train coaches Road traffic was also obstructed

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Protest against Agneepath Scheme: केंद्र सरकारने (Central Government) लष्कर (Army), नौदल (Navy) आणि वायुदलातील (Air Force) सैनिक भरतीसाठी (Soldiers Recruitment) ‘अग्निपथ’ योजना (Agneepath Scheme) जाहीर केल्यानंतर बिहार आणि राजस्थानमध्ये या योजनेला विरोध होऊ लागला आहे.

बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन (Movement At The Railway Station) करण्यात आलं असून या ठिकाणी दगडफेकही (Stone Pelting) करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही आडकाठी करण्यात आल्याने तिचाही बोऱ्या वाजला असल्याचं चित्र आहे.

संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस (Intercity Express At Bhabhua Railway Station) ट्रेनवर दगडफेक केली असून एक डबा आंदोलकांनी पेटवून दिला, योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय लष्कराचे चाहते असा बॅनर घेतलेला दिसत होता. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांकडून दगडफेक होत असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. यासोबत विद्यार्थ्यांनी लावलेली आग विझवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

#WATCH | Bihar: Youth demonstrate in Chhapra, burn tyres and vandalise a bus in protest against the recently announced #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/Ik0pYK26KY — ANI (@ANI) June 16, 2022

अजमेर-दिल्ली हायवे रोखला,बक्सर रेल्वे स्थानकावर केलं आंदोलन

जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखला. पोलिसांनी १० आंदोलकांना अटक केली आहे. दुसरीकडे बक्सर जिल्ह्यात १०० हून अधिक तरुण रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. ट्रॅकवर उतरत तरुणांनी जनशताब्दी एक्स्प्रेस ३० मिनिटांसाठी रोखली होती.

#WATCH | Bihar: Armed forces aspirants protest in Munger against #AgnipathRecruitmentScheme A protester says "We demand that the recruitment be done as it used to be done earlier,Tour of Duty (ToD) be rolled back & exams be held as earlier. Nobody will go to Army just for 4 yrs" pic.twitter.com/b5dnSUYohW — ANI (@ANI) June 16, 2022

देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असं सिंह यांनी सांगितलं होतं. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला होता.

[read_also content=”अमेरिकेत गर्भपाताची प्रकरणे वाढली, पाचपैकी एका गर्भवती महिलेने केलाय गर्भपात https://www.navarashtra.com/world/horrible-in-america-abortion-cases-increased-one-of-five-pregnant-women-have-had-an-abortion-nrvb-293037/”]

असा असेल मोबदला

यंदा ४६,००० जणांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती केली जाईल. ही भरती तीन महिन्यांतच सुरू होईल. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी ‘अग्निवीरां’ना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. प्रत्येक ‘अग्निवीरा’ला ११.७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल, शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवचही मिळणार आहे.

Web Title: Agitation against modi governments agneepath scheme in bihar students set fire to train coaches road traffic was also obstructed nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 03:11 PM

Topics:  

  • bihar
  • Modi government
  • Road Traffic

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
2

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…
3

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…

Bihar Opinion Poll: जातीच्या अंकगणिताने खेळ बदलणार! बिहारच्या कोणत्या झोनमध्ये NDA ठाम राहणार तर MGB ला कोणत्या भागात विजय मिळेल?
4

Bihar Opinion Poll: जातीच्या अंकगणिताने खेळ बदलणार! बिहारच्या कोणत्या झोनमध्ये NDA ठाम राहणार तर MGB ला कोणत्या भागात विजय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.