
कलयुगातील 'श्रवणकुमार'! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
नक्की काय घडलं?
झालं असं की, वृद्धत्वामुळे आईला चालण्या-फिरण्यात समस्या जाणवत होत्या. आपल्या पायांनी चालून ती भगवान बांके बिहारीचे दर्शन घेऊ शकत नव्हती पण तिच्या मनात देवाचे दर्शन घेण्य्याची इच्छा होती. अशात मुलाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा वापर केला. त्याने आपल्या आईला एका लोखंडी तबकडीत बसवून आणि डोक्यावर घेऊन वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरापर्यंत प्रवास केला. वाटेत अनेक अडचणींचा सामना करुन तो अखेर आपल्या आईला घेऊन देवाच्या दर्शनासाठी पोहचला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ हा मंदिराच्या आवारातील आहे. यात शेकडो भक्तांच्या गर्दीत हवेत एका घमेल्यात उचलून धरलेला मुलगा लगेच निदर्शनास पडतो. तिथे उपस्थित सर्व भाविक हे स्वत:च्या कल्यानासाठी, स्वत:साठी देवाकडे काही मागण्यासाठी पोहचलेले असतात पण एकमेव व्यक्ती असतो जो फक्त आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मंदिरात दाखल झालेला असतो. आईप्रती असलेली मुलाची अथांक भक्ती आणि प्रेम पाहून अनेकजण थक्क झाले तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली.
#यूपी: चलने-फिरने में असमर्थ एक महिला की इच्छा पूरी करने के लिए एक बेटा उसको लोहे के तसले में बैठाकर सिर पर रखकर #वृन्दावन बांके बिहारी मंदिर वृंदावन पहुंचा। मंदिर में मौजूद लोगों ने जब इनको देखा तो कुछ देर के लिए उनकी निगाहें उन्ही पर टिक गईं और सब उनके मुरीद हो गए। pic.twitter.com/z0X4424O9l — Sunil Upadhyay (@sunilgupadhyay) September 2, 2026
आजच्या कलियुगात जिथे मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याच्या बातम्या समोर येतात तिथेच अशी एक घटना मनाला समाधान देऊन जाणारी ठरते. बिहारीतील बांके शहरात घडलेली ही घटना केवळ व्यक्तीचे आईप्रती असलेले प्रेम दाखवत नाही तर त्यासाठी त्याने केलेले कठीण परिश्रम, समर्पण आणि कर्तव्याची झलक आपल्याला दाखवून देते. या घटनेचा व्हिडिओ @sunilgupadhyay नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.