Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: महाआघाडीचे ना जागावाटप, ना उमेदवार; बिहारमधून अमित शाहांचा इंडिया आघाडीवर निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 18, 2025 | 05:37 PM
Bihar Election 2025:  महाआघाडीचे ना जागावाटप, ना उमेदवार; बिहारमधून अमित शाहांचा इंडिया आघाडीवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमधील जनता राहुल गांधींना विसरली
  • निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक
  • . पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी बिहारमध्ये १२ सभा घेणार

 

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.  भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. अशातच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी काँग्रेस आणि  महाआघाडीवर निशाणा साधला आहे. ” महाआघाडीने जागा किंवा नेता निश्चित केलेला नाही. बिहारमधील जनता राहुल गांधींना विसरली आहे.  निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे.  एसआयआर देशभरात लागू केला पाहिजे. अशी प्रतिक्रीया  अमित शाहांनी दिली आहे. तसेच, एनडीएमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार

अमित शहा म्हणाले, “घुसखोर देशात मतदान कसे करू शकतात? परदेशी नागरिक बिहारचे भवितव्य ठरवतील का? आम्ही अशा लोकांना निवडकपणे देशातून हाकलून लावू. एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करेल. आरजेडी ध्रुवीकरण करत आहे.  आम्ही ते करत नाही. यापूर्वी बिहारमध्ये जंगलराज होते. पुढील १० वर्षांत बिहार पूरमुक्त होईल.” असं आश्वासनही त्यांनी  यावेळी बिहारच्या जनतेला दिले.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीतील १२१ जागांपैकी पहिल्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया १७ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी फक्त २० दिवस शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी ते सासाराम, गया आणि भागलपूरला भेट देतील.

ते २८ ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पटना येथे सभा घेणार आहेत. पंतप्रधानांचा तिसरा दौरा १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर येथे असेल. ३ नोव्हेंबर रोजी ते पश्चिम चंपारण, सहरसा आणि अररियामधील फोर्ब्सगंज येथे सभा घेणार आहेत.

Sanjay Gaikwad News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन? संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण

गृहमंत्री अमित शहांनी बिहारमध्ये उद्योग व विकासाच्या मु्द्द्यावर बोलताना म्हणाले की, “बिहारमध्ये जमीन कमी असल्याने मोठ्या उद्योगांऐवजी अशा उद्योगांना प्राधान्य द्यावे जे कमी जमीन घेतील. आम्हाला बिहारला देशाचे एआय हब बनवायचे आहे. येत्या १० वर्षांत बिहार कामगार निर्यात करणारे राज्य राहणार नाही, तर सॉफ्टवेअर उद्योगाचे केंद्र बनेल. “या उद्योगासाठी योग्य तरुणांसाठी संधी निर्माण करणे आणि त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न

बिहारमध्ये दरवर्षी होणाऱ्या पुरांचा उल्लेख करत शहांनी सांगितले की, चंद्रगुप्त मौर्यच्या काळापासून नेपाळचे पाणी गंगेच्या माध्यमातून बिहारमध्ये वाहत आहे. “नरेंद्र मोदींनी २०२४ च्या अर्थसंकल्पात कोसी प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची घोषणा केली. हे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. ५०,००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल आणि पुढील १० वर्षांत बिहार पुराच्या परिणामांपासून मुक्त होईल,” असे शहांनी सांगितले.

Web Title: Amit shah criticizes india front over seat distribution and candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress: ‘काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी रक्ताची होळी खेळायचे’; गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल
1

Amit Shah on Congress: ‘काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी रक्ताची होळी खेळायचे’; गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Photo: देवेंद्र फडणवीस जिंकणार बिहारचा गड? स्टार प्रचारक म्हणून मोठं शक्तीप्रदर्शन
2

Photo: देवेंद्र फडणवीस जिंकणार बिहारचा गड? स्टार प्रचारक म्हणून मोठं शक्तीप्रदर्शन

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल
3

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? JDU एका वरिष्ठ नेत्याने सांगितले नाव
4

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? JDU एका वरिष्ठ नेत्याने सांगितले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.