Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 सर्वोच्च न्यायालयाकडूनही निराशा ; अरविंद केजरीवालांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाहीयेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 24, 2024 | 03:39 PM
 सर्वोच्च न्यायालयाकडूनही निराशा ; अरविंद केजरीवालांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र ईडीने या जामीनावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालायनेही जामीन अर्जाला स्थगिती देत त्यांना तुरूंगात राहण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाने जामीनावर घेतलेल्या स्थगितीला केजरीवाल यांनी आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.  पण आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतही त्यांना दिलासा मिळाला नाही. आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू. असे सांगत न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितल्याने केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. या प्रकरणावर बुधवारी (२६ जून) सुनावणी होणार आहे.

सुनावणी दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाचा आदेश येऊ द्या, अशी विनंती केली.   हायकोर्टाने दोन दिवसांत निर्णय देऊ असे सांगितले असेल तर अडचण काय आहे? यावर केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हे योग्य नाही. निर्णय माझ्या बाजूने आला तेव्हा थांबायचे का?   ईडीने ४८ तासांचा अवधी मागितला होता पण राऊस एव्हेन्यू कोर्टाने तो दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला व प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी विंनती सिंघवी यांनी केली.

दरम्यान,  दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने अरविंद केजरीवाल यांना 9 वेळा समन्स पाठवले होते. त्यानंतर तो ईडीसमोर हजर झाला नाही. तपास यंत्रणेसमोर हजर न राहिल्याने आणि कोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. 10 दिवस ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर 1 एप्रिल रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी केली.

 

Web Title: Arvind kejriwals jail term extended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • Latest Political News
  • Marathi News
  • political news

संबंधित बातम्या

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
1

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार
2

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
3

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
4

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.