Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himanta Biswa Sarma : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य

आसाम भाजपच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला. त्यात हिमंता बिस्वा सर्मा प्रतीकात्मकपणे मुस्लिमांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 02:20 PM
Assam BJP targets Muslims through AI video of CM Himanta Biswa Sarma on x account

Assam BJP targets Muslims through AI video of CM Himanta Biswa Sarma on x account

Follow Us
Follow Us:

Himanta Biswa Sarma AI video : आसाम : सोशल मीडियावर एआय वापरुन व्हिडिओ तयार करणे आणि विरोधकांना लक्ष्य केले हा नवा ट्रेंड आला आहे. भाजप, काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष हे वापरत आहेत. मात्र यावरुन आसाममध्ये राजकारण तापले. जातीय तणाव आणि वक्तृत्वाच्या मुद्द्याने आसामचे राजकारणात वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केलेल्या एआय-जनरेटेड व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओ हिंसाचार भडकवताना दाखवण्यात आला होता, मात्र जोरदार टीकेनंतर तो डिलीट करण्यात आला.

शनिवारी, आसाम भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवर एक अत्यंत आक्रमक आणि जातीय वाद निर्माण करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्या हातात रायफल धरलेल्या खऱ्या फुटेजसह AI चा वापर करून तयार केलेले फुटेज दाखवण्यात आले. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा हे प्रतीकात्मकपणे “मिया” किंवा बंगाली वंशाच्या मुस्लिमांना लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर मुस्लीम समुदायातील लोक असल्याचे दिसून आले आहे. यावरुन नेटकऱ्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. यानंतर त्यांनी हा व्हिडिओ डिलीट केला. मात्र नेटकऱ्यांनी आसाम सरकारचा खरपूस समाचार घेतला.

हे देखील वाचा : RSS ला आले ग्लॅमर? संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानची उपस्थिती चर्चेत; मुस्लीमांबाबत राऊतांचा रोखठोक सवाल

या सोशल मीडिया पोस्टमधील व्हिडिओमधील दृश्येच नव्हे तर त्यातील मजकूरही आक्षेपार्ह होता. “पॉइंट ब्लँक शूट”, “दया नाही” आणि “बांगलादेशींना माफी नाही” असे वाक्य वापरले गेले. शिवाय, व्हिडिओमध्ये “तुम्ही पाकिस्तानला का गेला नाही?” असे प्रश्न देखील विचारले गेले होते, जे थेट एका विशिष्ट समुदायाविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार भडकवतात असे मानले जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार सागरिका घोष यांनी या जाहिरातीला “अत्यंत लज्जास्पद” म्हटले आणि जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

प्रिय प्रधानमंत्री जी,
आपका दुलारा मुख्यमंत्री अपने चुनावी विज्ञापन में सीधे मुसलमानों के सीने पर जो गोली मार रहा है वो दरअसल संविधान की छाती पर मार रहा है, एैसी ही एक गोली गोडसे ने महात्मा गॉंधी के सीने पर मारा था।
अब भले ही ये वीडियो डिलीट कर दिया गया हो लेकिन @narendramodi जी… pic.twitter.com/A6hreObA0Q
— Imran Pratapgarhi (@ShayarImran) February 8, 2026

अशा पद्धतीचा कंटेट शेअर केल्यामुळे समाजात द्वेषपूर्ण भावना पसरते आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या वर्तनावर शंका निर्माण होते असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. नेटकऱ्यांची टीका आणि आक्रोश इतका तीव्र होता की भाजपला अखेर त्यांचे वादग्रस्त ट्विट डिलीट करावे लागले, परंतु तोपर्यंत, स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

हे देखील वाचा : Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की वास्तविक मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी असे चिथावणीखोर व्हिडिओ जाणूनबुजून प्रसिद्ध केले जातात. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की, राज्य पूर, बेरोजगारी आणि वाढत्या महागाईसारख्या गंभीर समस्यांनी ग्रस्त असताना भाजपचा आयटी सेल अशा द्वेषपूर्ण व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे वक्तव्य हे आसाममधील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित बंगाली वंशाच्या मुस्लिमांना बाजूला ठेवण्यासाठी एक जाणूनबुजून केलेली रणनीती आहे, ज्यांना भारतीय नागरिकत्व असूनही, अनेकदा “बाहेरील” किंवा “बेकायदेशीर स्थलांतरित” म्हणून डिवचले जाते.

Web Title: Assam bjp targets muslims through ai video of cm himanta biswa sarma on x account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Assam
  • Assam CM
  • BJP Politics

संबंधित बातम्या

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
1

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.