एपस्टीन फाइल्समध्ये नावाचा उल्लेख झाल्याबद्दल आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या धर्मशाळेने प्रेस रिलीज काढले आहे (फोटो - सोशल मीडिया)
एपस्टीन फाइल्सने जागतिक राजकारण आणि ग्लॅमर जगतातील दिग्गजांची झोप उडवली आहे. अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या जेफ्री एपस्टाईनच्या गुप्त फायलींमध्ये अनेकांची नावं असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, दलाई लामा यांच्या कार्यालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर त्यांचे नाव कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्कर जेफ्री एपस्टाईनशी जोडल्याच्या दाव्यांवर कडक शब्दांत इशारा दिला आहे. धर्मशाळेतून जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की परमपूज्य १४ वे दलाई लामा कधीही जेफ्री एपस्टाईन यांना भेटले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे धर्मशाळेकडून सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर
“कधीही भेटलो नाही, कधीही परवानगी दिली नाही” – धर्मशालाचे मोठे विधान
दलाई लामांनी त्यांच्या वतीने कोणालाही एपस्टाईनशी भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी कधीही दिली नाही याची पुष्टीही या निवेदनात करण्यात आली आहे. कार्यालयाने या अहवालांना “पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि निराधार” म्हटले आहे, ते दलाई लामांना चुकीचे चित्रित करण्याचा प्रयत्न आहे., असे देखील प्रेस रिलीजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.
Press Statement Some recent media reports and social media posts concerning the “Epstein files” are attempting to link His Holiness the Dalai Lama with Jeffrey Epstein. We can unequivocally confirm that His Holiness has never met Jeffrey Epstein or authorised any meeting or… pic.twitter.com/QtV6B3Wr0u — Dalai Lama (@DalaiLama) February 8, 2026
या प्रेसमध्ये लिहिण्यात आले आहे. ‘एपस्टीन फाइल्स’ संबंधी काही अलीकडील माध्यमांतील अहवाल आणि सोशल मीडियावरील पोस्ट परमपूज्य दलाई लामा यांना जेफ्री एपस्टीन यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निःसंदिग्धपणे पुष्टी करतो की परमपूज्य दलाई लामा यांनी जेफ्री एपस्टीन यांची कधीही भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्या वतीने कोणालाही त्यांच्याशी भेटण्याची किंवा संवाद साधण्याची परवानगी दिलेली नाही, असे धर्मशाळेकडून सांगण्यात आले आहे.
हे देकील वाचा : ‘भारत हेच माझे घर!’ तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या ‘त्या’ एका वाक्याने अवघे विश्व झाले होते स्तब्ध
जेफ्री एपस्टाईनमुळे कोणते सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात?
जेफ्री एपस्टाईन हा एक हाय-प्रोफाइल न्यू यॉर्कर होता, त्याच्यावर २००५ मध्ये पहिल्यांदा आरोप लावण्यात आला होता. २०१९ मध्ये, त्याला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली, परंतु कोठडीत असताना त्याने आत्महत्या केली. एपस्टाईन त्याच्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांसाठी ओळखला जात असे, ज्यात जगातील सर्वात प्रभावशाली लोक उपस्थित राहत असत. एपस्टाईनच्या फायलींमधून अनेक प्रमुख व्यक्तींची नावे आणि फोटो उघड झाले आहेत, ज्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प , बिल क्लिंटन आणि पॉप स्टार मायकल जॅक्सन यांचा समावेश आहे.






