‘आज हल्ला झाला, उद्या खून होऊ शकतो’, पश्चिम बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यामुळे अधीर रंजन ममतांवर संतापले

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी सातत्याने ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत आहेत. याच्या एक दिवस आधी त्यांनीम्हटले होते की, ममता पंतप्रधानांच्या सेवेत व्यस्त आहेत.

    पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी यांचा तृणमूल काँग्रेसवर हल्ला सुरूच आहे. जागावाटपावरून ममता बॅनर्जींवर सातत्याने हल्ला करणाऱ्या अधीर यांनी आता पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून टीएमसी सरकारला कोंडीत पकडले आहे.

    पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी (५ जानेवारी) ईडी टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, “सत्ताधारी सरकारच्या गुंडांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, देशात कायदा आणि सुव्यवस्था नाही. आज अधिकारी जखमी झालेत, उद्या त्यांची हत्याही होऊ शकते, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक नाही.”

    काय आहे संपूर्ण प्रकरण

    रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते एसके शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीची टीम उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावात पोहोचली होती. त्यानंतर जवळपास 200 लोक तेथे आले आणि त्यांनी ईडी टीमवर हल्ला केला. जमावाने ईडी अधिकाऱ्यांसोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांचीही तोडफोड केली. या टीममध्ये ईडीच्या सहाय्यक संचालकाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या ईडी टीमच्या सदस्यांना कोलकाता येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.