Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayodhya Ram Suryatilak : अयोध्येत प्रभू श्री रामांना सूर्यतिलक; तेजस्वी प्रकाशाने उजळले रामांचे मनमोहक रुप

Ayodhya Ram Suryatilak : रामनवमी पर्वामुळे अयोध्येमध्ये उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरण आहे. यानिमित्ताने प्रभू रामांना सूर्यतिलक करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 02:58 PM
Ayodhya Ram mandir Ram Suryatilak on the occasion of Ram Navami 2026

Ayodhya Ram mandir Ram Suryatilak on the occasion of Ram Navami 2026

Follow Us
Follow Us:
  • अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचा सूर्यतिलक
  • दुपारी 12 वाजता चार मिनिटे झाला सूर्यतिलक
  • पंतप्रधान मोदींनी घेतले लाईव्ह दर्शन
Ayodhya Ram Suryatilak  : अयोध्या : प्रभू श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये (Ayodhya Ram Mandir) रामनवमीचा मोठा उत्साह आहे. अध्योयेमध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लांना सूर्यतिलक करण्यात आला. यावेळी मूर्तीवर तेजस्वी सूर्यकिरण पडल्याने मनमोहक रुप पाहायला मिळाले. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑनलाईन स्वरुपामध्ये लाईव्ह दर्शन घेतले.

रामनवमी पर्वामुळे अयोध्येमध्ये उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरण आहे. यानिमित्ताने प्रभू रामांना सूर्यतिलक करण्यात आला. प्रभू रामांच्या ललाटबिंबावर सूर्याची तेजस्वी किरणे चमकत होती. यामुळे तिलक म्हणून मूर्तीवर लावण्यात आलेले हिरे अतिशय चमकत होते.बरोबर दुपारी बारा वाजता सूर्य मध्यावर आल्यानंतर हा सुर्यतिलक करण्यात आला. यावेळी सूर्याची किरणे प्रभूंच्या कपाळावर पडली आणि मोहक रुप दिसून आले. चार मिनिटे प्रभू रामांना हा सूर्यतिलक करण्यात आला.

हे देखील वाचा : देशात पुन्हा लॉकडाऊन? सोशल मीडियावरील अफवांवर केंद्र सरकारचा मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी हा दिव्य क्षण अनुभवला होता. यापूर्वी २०२४ साली, जेव्हा पंतप्रधान मोदी आसाममध्ये एका सभेला संबोधित करणार होते, तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टरमधून टॅबलेटद्वारे रामलल्लाच्या सूर्यटिळकाच्या अलौकिक दृश्याचे थेट प्रक्षेपण पाहिले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अयोध्येत दुपारी १२ वाजता अभिजीत मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलक करण्यात आला. यावेळी गर्भगृहात १४ पुजारी उपस्थित होते आणि सूर्यतिलकानंतर आरती करण्यात आली. रामलल्लाचे दारही काही काळासाठी बंद करण्यात आले होते.

जय श्री राम! रामनवमी के अवसर पर श्रीराम जन्मभूमि में श्री रामलला के मस्तक पर सूर्य तिलक का यह दिव्य दृश्य हर रामभक्त के लिए अलौकिक है। pic.twitter.com/xyxbW9K6KN — Amit Shah (@AmitShah) March 27, 2026

हे देखील वाचा : देशात एक आठवड्याचाही साठा शिल्लक नाही; LPG गॅसबाबत बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

रामनवमीनिमित्त अयोध्येत सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. या धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्यासाठी लोक दूरदूरच्या ठिकाणांहून आले होते. पहाटे पवित्र स्नान करून, रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली. प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी लोक सकाळपासूनच रांगेत उभे होते. भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण शहर ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. जिल्हा प्रशासनानेही या प्रसंगासाठी संपूर्ण सुरक्षेची खात्री केली होती. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरभर विविध ठिकाणी रणनीतिकरित्या पोलीस दल तैनात करण्यात आले होते. सुरक्षेच्या व्यवस्थेमुळे भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय दर्शन घेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Web Title: Ayodhya ram mandir ram suryatilak on the occasion of ram navami 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • ayodhya
  • PM Narendra Modi
  • ram mandir

संबंधित बातम्या

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
1

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
2

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे
3

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा
4

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.