कोलकाता: कोलकाता बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाताच्या आर.जी. वैदकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टच्या मध्यरात्री डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यत आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेला सीबीायच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणीकडे रुग्णालयातील काही गुपिते माहिती पडली होती. त्यामुळे जाणीवपूर्व बलात्कार करून तिची हत्या केली असावी, असा दावा तिच्या काही सहकाऱ्यांनी केला आहे. सीबीआयने गेल्या 2 दिवसांत मृत तरुणीसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. यातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीआयला रुग्णालयात मानवी अवयवांच्या तस्करी सुरू असल्याचे म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे, ही घटना सामान्य वाटावी, यासाठी तरुणीवर बलात्कार करण्यात आला असावा, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, यातून अनेक व्हाईट कॉलर लोकही समोर येतील, असा दावाही सीबीआयने केला आहे.
हेदेखील वाचा: दिवसा लेट पण रात्री अपडेट; उशिरा येणारी ट्रेन रात्रीचा टाईम कसा कव्हर करते
सीबीआयने केलेल्य चौकशी दरम्यान, गेल्या काही काळापासून वैद्यकीय रुग्णालयात सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवले जात असल्याचाही माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, 23 वर्षांपूर्वी 2001 मध्ये कॉलेजच्या वसतिगृहात झालेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचे धागेदोरेही जोडले जात आहेत. या प्रकरणात एका राजकीय नेत्याचा आणि त्याच्या भाच्याचाही हात असल्याची माहिती आहे.
एका राजकीय पक्षाच्या नेत्याने, रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे स्क्रीनशॉट असून ज्यात हॉस्पिटलमधील सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवले जात असल्याचे मजकूर असल्याचा दावा केला आहे. सीबीआयच्या चौकशीदरम्यान, मेडीकल कॉलेजमधील महाविद्यालयातील चार जणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टाफ आहे. हे चौघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असून ते रुग्णालयात सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, या प्रकरणातील ठोस पुरावे गोळा केले जात असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: गुप्तांगावर जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव…! कोलकाता महिला डॉक्टरसोबत काय झाले?
याशिवाय, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आणि आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काही औषधे व वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम व्यवस्थापनाच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आले होते, मात्र अटींनुसार औषधांचा पुरवठा होत नव्हता. याची माहिती पीडितेला होती. हे देखील या हत्येमागे कारण असावे असा संशय आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरचा दावा आहे की, पीडितेने यापूर्वी आरोग्य भवनमध्ये याबाबत तक्रार केली होती. मात्र, आरोपींच्या प्रभावामुळे कारवाई झाली नाही. प्रशिक्षणार्थी डॉक्टर पुराव्यासह संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर उघड करण्याच्याचा विचारात होती.
हेदेखील वाचा: मुंबईत काँग्रेसला सुरुंग; बडा नेता अजित पवारांच्या गळाला