प्रवासाचे स्वस्त आणि वेगवान साधन म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. अगदी स्वस्तात तुम्हाला ट्रेनमुळे लांबचा प्रवास करता येतो. बऱ्याचदा लोका एखाद्या लांबच्या प्रवासासाठी जायचे असल्यास रात्रीच्या वेळेची ट्रेन बुक करतात. याचे कारण असे की सकाळी उशिरा येणारी ट्रेन रात्री लवकर वेळेत पोहचते. पण तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का की, सकाळी उशिर करणारी ट्रेन रात्री लवकर कशी येते? हे कसे घडते? नसेल तर आज आपण या संवादाचा 'स्पीड' पकडू. चला तर मग रात्री सरपटत धावणाऱ्या ट्रेनमागील कारण जाणून घेऊयात.
अकोल्यात फुकट्या प्रवाशांकडून 1.36 कोटींचा दंड वसूल; 23 हजार 480 जणांना दणका
दिवसा ट्रेन कमी अंतराच्या एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंत किंवा एका शहरातून दुसऱ्या जवळच्या शहरात धावतात. अशा वेळी एखादी ट्रेन पुढे जात असेल किंवा प्लॅटफॉर्मवर उभी असेल तर रूळावर स्पीड ब्रेकर लावले जातात.
तसेच ट्रेनचा मेंटेन्सची कामे दिवसा केली जातात त्यामुळे तिला उशीर होतो. पण रात्रीच्या वेळी अशी कोणतीही कामे केली जात नाही ज्यामुळे ट्रेन रात्रीचा प्रवास लवकर पूर्ण करते
तसेच ट्रेन लवकर वेळेत पोहोचण्यासाठी सिग्नल महत्त्वाचे काम करतात. रात्रीच्या वेळी सिग्नल ट्रेन चालकाला लांबूनही स्पष्ट दिसतात मात्र दिवसा जवळ गेल्यावरच सिग्नल दिसून येतो. तसेच रात्रीच्या वेळी सिग्नल फक्त धुके आणि पाऊस नसला तर दिसतो
File Photo ; Train
फोटो सौजन्य - Social Media