
Bihar CM Nitish Kumar remained silent on apology for woman doctor hijab being pulled off
महिला डॉक्टरचा हिजाब ओढलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडून माफी मागण्याची मागणी केली. दरम्यान, नितीश कुमार दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले, जिथे माध्यमांनी त्यांच्यावर या वादाबद्दल प्रश्नांचा भडिमार केला. मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी टाळले आहे. तसेच माफीनामाचा विषय निघताच त्यांनी हात जोडले.
हे देखील वाचा : VB-G RAM G : मोदी सरकारचा निर्धार पूर्ण! जी राम जी विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजूरी
हिजाब वादावर प्रश्न टाळताना दिसले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली विमानतळावर पोहोचले तेव्हा माध्यमांनी त्यांना एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढून काढण्याच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला. यावेळी त्यांना माफी मागणार का असे देखील विचारले. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची थेट उत्तरे दिली नाहीत. ते फक्त हसले, हात जोडून काहीही न बोलता त्यांच्या गाडीत बसले आणि निघून गेले. त्यांचे हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाला. या संवेदनशील मुद्द्यावर मुख्यमंत्री गप्प का राहिले यावर लोक चर्चा करू लागले.
विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केले
विरोधी पक्षाने नितीश कुमार यांच्या मौनावर तीव्र टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा मुद्दा महिलांच्या सन्मान आणि धार्मिक भावनांशी संबंधित आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर उघडपणे बोलले पाहिजे. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की जेव्हा संवेदनशील मुद्दा समोर येतो तेव्हा मुख्यमंत्र्यांचे मौन नकारात्मक संकेत देते.
हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये हिंदूवर प्राणघातक हल्ले अन् जाळपोळ; RSS मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं
नेमकं झालं काय?
हिजाब घातलेली नवनियुक्त डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली त्यावेळी नितीश कुमारांनी महिलेला, “हे काय आहे, असे विचारत स्टेजवर उभे असलेले नितीश कुमार थोडेसे वाकले आणि तिच्या चेहऱ्यावरील हिजाब खाली ओढला. आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमाचे फोटो नितीश कुमार यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंसोबतच्या पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी लिहिले की, “आज मी मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या ‘संवाद’ येथे १,२८३ आयुष डॉक्टरांच्या (आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी) नियुक्ती पत्र वितरण समारंभाला उपस्थित राहिलो.”