Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा; विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व 21 ठिकाणी विजयी

प्रभाग १ भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर यांनी घेतलेली आघाडी पुढील सर्वच प्रभागातुन वाढतच गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 21, 2025 | 01:16 PM
म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा, विरोधकांचा सुपडासाफ

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा, विरोधकांचा सुपडासाफ

Follow Us
Close
Follow Us:

म्हसवड / महेश कांबळे : म्हसवड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपने पहिल्याच फेरीपासून आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असून, विरोधकांना पराभवाची धूळ चारताना नगराध्यक्षपदासह सर्व ठिकाणी विजय मिळवत विरोधकांचा पुरता सुपडासाफ केल्याने भाजपचा हा एकतर्फी विजय झाल्याचे दिसून येते.

२ डिसेंबर रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत २१ जागेसाठी ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये म्हसवड पालिकेचे नगराध्यक्षपद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी ३ महिला निवडणुकीच्या उतरल्या होत्या. या निवडणुकीत भाजपकडून पुजा सचिन विरकर, सिध्दनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने तर बहुजन समाज पार्टीकडून रुपाली वाल्मिक सरतापे या तिन महिला निवडणुक लढवत होत्या. तर इतर १० प्रभागातून काही अपक्षासह भाजप, शिवसेना व ठाकरे गट असे उमेदवार काही उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावित होते.

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिल्याच फेरीपासून भाजपने विजय मिळवत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम राहिली. प्रभाग १ भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर यांनी घेतलेली आघाडी पुढील सर्वच प्रभागातुन वाढतच गेली. कोणत्याही प्रभागातुन त्यांची आघाडी कमी न झाल्याने पुजा विरकर यांना ग्रामीण मतदारांसह शहरी मतदारांनाही मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसुन आले.

हेदेखील वाचा : Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत

प्रभाग क्र. १ पासुन भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कोणत्याच प्रभागात कमी झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर या ५१७३ मतांनी विजयी झाल्या, तर भाजपच्या सर्व उमेदवारांनीही एकतर्फी विजय मिळवत पालिकेची सत्ता हाती घेतली आहे.

म्हसवड पालिकेची निवडणुक जाहीर झाल्यापासुनच भाजपचे ग्राम विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती, २१ / ० करुन पालिकेची सत्ता हाती घेणार असल्याचे ते आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगत होते, त्यानुसार त्यांनी व्यूहरचना करत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. आपल्या विश्वासु सहकार्यांसह प्रचाराचे नेटके नियोजन करीत मंत्री गोरे यांनी विरोधकांना सर्वच ठिकाणी धोबीपछाड देत पालिकेवर एकहाती भाजपचा झेंडा रोवला आहे.

Web Title: Bjp wins in mhaswad municipality bjp wins in all 21 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य
1

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

Satara ZP Politics: साताऱ्यात लोकशाहीचा गळा घोटला? जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचा एल्गार
2

Satara ZP Politics: साताऱ्यात लोकशाहीचा गळा घोटला? जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचा एल्गार

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! राष्ट्रवादीला मोठे खिंडार; सभापती निवडीत ‘बॅकूम स्ट्रॅटेजी’ यशस्वी
3

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! राष्ट्रवादीला मोठे खिंडार; सभापती निवडीत ‘बॅकूम स्ट्रॅटेजी’ यशस्वी

बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवरील सुविधांकडे दिलं जातंय लक्ष
4

बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवरील सुविधांकडे दिलं जातंय लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.