Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election Opinion Poll 2025: तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती; निवडणूक सर्वेक्षणाने वाढवले भाजपचे टेन्शन

पक्षनिहाय सर्वेक्षणानुसार, भाजपला एनडीएमध्ये ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८ आणि एलजेपी (रामविलास) ५ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एचएएम आणि आरएलएमला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 03, 2025 | 04:00 PM
Bihar Election Opinion Poll 2025: तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती; निवडणूक सर्वेक्षणाने वाढवले भाजपचे टेन्शन
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार निवडणूक सर्वेक्षणातील मोठी अपडेट
  • तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
  • एनडीए-महाआघाडीचा नंबरगेम ठरवणार भावी मुख्यमंत्री
  • नितीश कुमार मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या क्रमांकावर

Bihar Election Opinion Poll 2025: बिहार निवडणूकपूर्व सर्वेक्षण: बिहार विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जवळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. दरम्यान, जेव्हीसी सर्वेक्षणामुळे राजकीय वातवारण तापू लागले आहे. अशातच बिहारमध्ये झालेल्या निवडणूक सर्वेक्षणातून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पण त्याचवेळी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मात्र झोप उडणार आहे.

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेले तेजस्वी यादव हे सर्वात पसंतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उदयास आले आहेत, तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार लोकप्रियतेत त्यांच्यापेक्षा मागे आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे देखील लोकांच्या आवडत्यांमध्ये आहेत.

मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव  यांना पहिली पसंती

जेव्हीसी पोलनुसार, तेजस्वी यादव यांना ३३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर त्यांच्यापाठोपाठ नितीश कुमार यांना २९ टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे. तर १० टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांना योग्य मानले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना ९ टक्के लोकांनी कल दिला आहे.

Tamil Nadu CM on SIR: SIR ‘वरून राजकारण तापणार; तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांसह ४८ पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार

२३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेले सर्वेक्षण

सर्वेक्षणात, ५ टक्के मतदारांचा असा विश्वास आहे की महाआघाडीचा दुसरा चेहरा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर ४ टक्के लोकांनी दुसऱ्या भाजप नेत्यावर विश्वास व्यक्त केला. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हा सर्वेक्षण करण्यात आला. फोन कॉल आणि थेट मुलाखतींद्वारे ३२,६५७ लोकांकडून मते गोळा करण्यात आली.

जागांमध्ये एनडीए आघाडीवर

तेजस्वी यादव यांच्या बाजूने जनतेने कल दिला असला तरी, अंदाजित जागांच्या संख्येच्या बाबतीत एनडीए पुढे असल्याचे दिसून येते. सर्वेक्षणांनुसार, एनडीए १२० ते १४० जागा जिंकू शकते. महाआघाडीला ९३ ते ११२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ जागा आहे.

कोणता पक्ष किती जागा जिंकेल?

पक्षनिहाय सर्वेक्षणानुसार, भाजपला एनडीएमध्ये ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८ आणि एलजेपी (रामविलास) ५ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एचएएम आणि आरएलएमला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, महाआघाडीमध्ये, आरजेडीला ६९ ते ७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला ९ ते १७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सीपीआय (एमएल) १२ ते १४ जागा, सीपीआय १ आणि सीपीआय (एम) १ ते २ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

सर्वेक्षणानुसार, तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदासाठी प्राथमिक पसंती असले तरी, एनडीएला अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय, हे फक्त एक सर्वेक्षण आहे; खरे चित्र १४ नोव्हेंबर रोजी, निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Bihar election opinion poll 2025 tejashwi yadav is most preferred for the post of chief ministerbjps tension increased due to election survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • BJP
  • Nitish Kumar
  • RJD

संबंधित बातम्या

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान
1

५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सेनेचा ‘दगाबाज रे’ अभियान

Bihar Elections 2025: UP मध्ये नेत्यांच्या मुलींची जोरदार हवा! RJD-JDU पासून BJP पर्यंत सर्वच पक्षात परिवारवाद
2

Bihar Elections 2025: UP मध्ये नेत्यांच्या मुलींची जोरदार हवा! RJD-JDU पासून BJP पर्यंत सर्वच पक्षात परिवारवाद

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
3

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

BJP Mook Andolan: ‘सत्या’च्या मोर्चाविरोधात मूक आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपाचं प्रत्युत्तर
4

BJP Mook Andolan: ‘सत्या’च्या मोर्चाविरोधात मूक आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपाचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.