Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election Result: बिहारमधील मतचोरीचे दोन आठवड्यांत पुरावे देणार; काँग्रेसचे खुले आव्हान

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बुथ व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट वाटपाच्या आरोपांची गंभीरता तपासण्यास सांगितले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2025 | 10:33 AM
Bihar Election Result:

Bihar Election Result:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार निवडणुकीत हेराफेरी
  • काँग्रेसकडून हेराफेरीचे पुरावे गोळा करण्यास सुरूवात
  • बिहारमधील मतचोरीचे दोन आठवड्यांत पुरावे देणार

Rahul Gandhi on Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने थेट मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. पक्षाकडून निवडणुकीतील हेराफेरीचे पुरावे गोळा केले जात असून ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर केले जातील,असे खुले आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, कोषाध्यक्ष अजय माकन आणि राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा उपस्थित होते. बिहारमधील पराभवाची कारणे, मतमोजणीतील अनियमितता आणि भविष्यातील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी बिहार निवडणूक निकालांबाबत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, मतमोजणीच्या अनेक टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पक्षाला वाटते. बिहार निवडणुकीत मतचोरी झाल्यामुळेच पक्षाचा पराभव झाला. काँग्रेस आता संपूर्ण मतदानाच्या आकडेवारीचा तपशीलवार आणि सखोल आढावा घेणार असून, अहवाल तयार झाल्यानंतर निवडणुकीतील कथित मतचोरीची माहिती देशासमोर मांडली जाईल. एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यांपासून संसदेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आल्याचेही के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

६ जागांवर विजय

काँग्रेसने बिहारमध्ये ६१ जागांवर उमेदवार उभे कैले होते, परंतु त्याना फक्त सहा जागांवर विजय मिळाला, पक्षाच्या मतांचा वाटा ८.७१% पर्यंत घसरला, जो २०२० मध्ये ७० जागा लढवताना ९.६% होता. सुरेंद्र प्रसाद (वाल्मिकी नगर), अभिषेक रंजन (चनपटिया), मनोज विस्वास (फोर्ब्सगंज), अबिदुर रहमान (अररिया), मोहम्मद कमरूल होडा (किशनगंज) आणि मनोहर प्रसाद सिंग (मनिहारी) है सहा उमेदवार विजयी झाले.

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

राहुलकडून तक्रारींचा पाऊस

सूत्रांनुसार, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बुथ व्यवस्थापनातील त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पैशाच्या बदल्यात तिकीट वाटपाच्या आरोपांची गंभीरता तपासण्यास सांगितले. राहुल यांनी त्यांच्या सल्लागार गटाने संपूर्ण निवडणुकीत अंधारात ठेवले, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार निवडण्यासाठी विश्वासू नेत्यांची समिती स्थापन करूनही योग्य उमेदवार का निवडले गेले नाहीत ? तिकीट विक्रीचे आरोप का केले जात आहेत? असे सवाल उपस्थित करत सत्य समोर आणले पाहिजे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही. पक्षाने स्वतःच्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच ते वैयक्तिकरित्याही याची चौकशी करतील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी खर्गे यांना पक्षातील गद्दारांना ओळखून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.

 

 

Web Title: Bihar election result proof of vote rigging congress challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Bihar Election 2025

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
1

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
2

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
3

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
4

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.