Bihar Election 2025: बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी भाजपकडून सुचवलेल्या काही उमेदवारांना थेट नकार दिला, ज्यामुळे मंत्रिमंडळ रचनेसंदर्भात किंवा सरकार स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नितीश यांच्या भूमिकेबद्दल भाजपमध्ये असंतोष असल्याचेही वृत्त समोर येत आहे; मात्र बिहारच्या राजकारणातील नितीश कुमार यांची निर्णायक भूमिका लक्षात घेता भाजप त्यांना नाराज करण्याच्या मूडमध्ये नाही.
Explainer: RJDपेक्षा कमी मते मिळवूनही भाजपने जास्त जागा कशा जिंकल्या? कसे आहे निवडणुकीचे समीकरण
दरम्यान, सोमवारी उशिरा जेडीयूच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना पाटण्यात बोलावण्यात आले आहे. नितीश कुमार यांना सरकार स्थापनेची कोणतीही घाई नसल्याचे दिसत असून, ते भाजप नेत्यांशी चर्चेसाठीही उत्सुक नसल्याचे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. बिहारच्या सत्ताकाठीचा तिढा अजून सुटलेला नसून दोन्ही पक्षांतील समन्वयाचा तोल आगामी काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोजपा (आर) प्रमुख चिराग पासवान हे शनिवारी सकाळी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक सुमारे २५ ते ३० मिनिटे चालली, त्यानंतर त्यानी माध्यमांना सांगितले की ही औपचारिक बैठक होती. ज्यामध्ये निवडणूक निकाल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चिराग म्हणाले की जदयु आणि लोजपा (आर) यानी अनेक जागांवर एकमेकांना पाठिंबा दिला आणि विजयाचे श्रेय संयुक्त प्रयत्नांना दिले. मुख्यमंत्रिपदाबद्दल विचारले असता, त्यांनी ते रालोआ नेतृत्वाबर सोपवले ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
सूत्रांनुसार, जदयुकडून सम्राट चौधरी आणि अशोक बौधरी यांच्या नावांवर एकमत होताना दिसत नाही. जदयुच्या एका गटाचे मत आहे की, त्यांच्यावर आरोप आहेत. आरोप करणारा जनसुराज पक्ष निवडणुकीत खातेही उघडू शकला नाही, परंतु त्यांचे आरोप कायम आहेत. माणून, त्यांनी प्रथम आरोपांना उत्तर द्यावे. ते निदर्दोष ठरल्यानंतरच त्यांना सत्तेत घेतले पाहिजे. जदयुला याला सुशासनाचे एक उत्तम उदाहरण बनकण्याची इच्छा आहे. तथापि, भाजपाने याला विरोध केला आहे. कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वतः सम्राट चौधरींना एक प्रमुख चेहरा बनवण्याचा हेतू जाहीरपणे व्यक्त केला.
भाजपाने म्हटले की, मुख्यमंत्रिपदावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवाय, असे म्हटले जात आहे की बिहारमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाला गृह, उद्योग, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि वित्त ही मलाईदार खाती हवी आहेत. यापैकी गृहखाते सातत्याने मुख्यमंत्री नितीशकुमार याच्याकडे आहे, जदयु समर्थकांनी प्राप्न उपस्थित केला की वित्त, गृह, नगरविकास, उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम खाती भाजपाला दिली तर नितीशकुमार फक्त मुख्यमंत्रिपदावर सरकार कसे चालवतील? जदयुचा सर्वांत गंभीर आक्षेप गृह आणि वित्त मंत्रालयांबाबत आहे. शिवाय, विधानसभेच्या अध्यक्षांबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे.






